ब्रेकींग न्यूज : मंत्री गिरीश महाजनांकडून पत्रकार थत्ते आणि खडसेंना अब्रुनुकसानीची नोटीस

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । पत्रकार अनिल थत्ते आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारचे आमदार एकनाथराव खडसे यांना मंत्री गिरीश महाजन यांनी आपल्या वकिलाच्या माध्यमातून अब्रु नुकसानीची नोटीस पाठविण्यात आल्याची माहिती समोर आल्यामुळे राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

मंत्री गिरीश महाजन यांचे एका महिला अधिकाऱ्याच्या सोबत फोनवर बोलण्याच्या बाबत संबंध असल्याचा आरोप पत्रकार अनिल थत्ते यांनी केला होता. त्यांच्या या आरोपाला धरून एकनाथ खडसे यांनीही मंत्री गिरीश महाजन यांचेवर टीका करण्याची संधी साधली होती. अनिल थत्ते आणि एकनाथ खडसे यांनी केलेल्या टीकेनंतर गिरीश महाजन यांच्याबाबत विविध चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या होत्या.

कोणतेही सबळ पुरावे न देता पत्रकार अनिल थत्ते आणि एकनाथ खडसे यांनी आपल्यावर टीका केल्याने जनमानसात आपली प्रतिमा मलिन झाल्याचे कारण देत, मंत्री गिरीश महाजन यांनी या दोघांच्या विरोधात अब्रु नुकसानीची नोटीस बजावली असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान आपल्याला अशा कोणत्याही प्रकारची नोटीस अद्यापपर्यंत प्राप्त झाली नसल्याचे एकनाथराव खडसे यांनी सांगितले आहे.

Protected Content