Home Cities मुक्ताईनगर दुष्काळी परिस्थितीचे भान ठेवत मुक्ताईनगरात साधेपणाने सरदार वल्लभभाई पटेल जयंती साजरी

दुष्काळी परिस्थितीचे भान ठेवत मुक्ताईनगरात साधेपणाने सरदार वल्लभभाई पटेल जयंती साजरी

0
60

मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | भारताचे लोहपुरुष आणि देशाचे पहिले उपपंतप्रधान सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त मुक्ताईनगर येथे वीर गुर्जर सरदार वल्लभभाई पटेल फाउंडेशन व सर्व समाज बांधवांच्या वतीने साधेपणाने जयंती साजरी करण्यात आली.

परिसरातील दुष्काळी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन यंदा कोणताही गाजावाजा किंवा अनावश्यक खर्च न करता अत्यंत साध्या व शिस्तबद्ध पद्धतीने जयंती सोहळा आयोजित करण्यात आला. या उपक्रमातून सामाजिक परिस्थितीचे भान आणि संवेदनशीलतेचा संदेश देण्यात आला.

यावेळी सर्व समाज बांधवांसह सर्वपक्षीय नेते, पदाधिकारी व मान्यवरांनी उपस्थित राहून सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन केले. तसेच सामाजिक एकोपा, बंधुभाव आणि राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देण्यात आला.

कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी फाउंडेशनचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, कोषाध्यक्ष, सर्व पदाधिकारी व सदस्यांनी परिश्रम घेतले. साधेपणातून सामाजिक जाणीव जपणारा हा जयंती सोहळा परिसरात चर्चेचा विषय ठरला.


Protected Content

Play sound