बोदवड येथील नम्र फायनान्सचे लाखो रुपये लंपास

WhatsApp Image 2019 10 14 at 2.29.47 PM

बोदवड, प्रतिनिधी | येथील जामठी रस्त्यावर असलेली ठोंबरे दुग्धल्यायच्यावर असलेल्या नम्र फायनान्सच्या ऑफिस मध्ये रात्री ३ ते ३.३० वाजेच्या दरम्यान चोरांनी १२ लाख रुपये घेऊन पोबारा केला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, नम्र फायनान्स लि.मध्ये चोरी झाली त्यावेळी फायनान्सचा एक कर्मचारी रोकड असलेल्या बाजूच्या रूममध्ये झोपलेला होता.
विशेष म्हणजे नम्र फायनान्सचे ऑफिसचे दरवाजे रात्री सताड उघडे होते असे त्या कर्मचाऱ्याने सांगितले आहे. ज्या रूममध्ये १२ लाख रुपयांची चोरी झाली त्याच्या शेजारीच नम्र फायनांस चा संबंधित कर्मचारी अमोल मोरे झोपलेला होता.कपाटाचा लॉक तोडून चोरी करण्यात आली आहे. चोरी झाली त्यावेळेस मला कसलाही आवाज आला नाही किंवा या घटनेबद्दल काहीच माहित नाही असे मोरे याचे म्हणणे आहे.घटनेच्या ठिकाणी सीसीटीव्ही फुटेजमध्ये एक संशयित नम्र फायनान्सच्या बाहेर तोंड बांधून हातात रॉड घेऊन फिरतांना दिसत आहे. याचोरीच्या घटनेत एक पेक्षा अधिक लोक असल्याचा संशय असून याबाबत अधिक तपास पोलीस करीत आहे.

Protected Content