धावत्या रेल्वेतून पडल्याने परप्रांतीय तरूणाचा मृत्यू

जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । नाशिक ते मध्यप्रदेश असा प्रवास करत असतांना धावत्या रेल्वेतून तोल जावून पडल्याने ३० वर्षीय परप्रांतीय तरूणाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना रविवारी ६ एप्रिल रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास जळगाव ते शिरसोली दरम्यानच्या डाऊन रेल्वे लाईनवर झाली आहे. सोमवारी ७ एप्रिल रोजी सकाळी १० वाजता शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे. याबाबत रामानंद नगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आलीआहे. सुरेश सीताराम आदवासी (३०, रा. सेल्हा, जि. पन्ना, मध्यप्रदेश) असे मयत परप्रांतीय तरूणाचे नाव आहे.

याबाबत अधिक असे की, सुरेश आदवासी हा तरूण नाशिक येथे कामाला आहे. दरम्यान रविवारी ६ एप्रिल रोजी नाशिक येथून कटणी येथे रेल्वने प्रवास करत होतो. दुपारी १२ वाजेच्या सुमारास रेल्वे ही जळगाव ते शिरसोली दरम्यानच्या रेल्वेतून प्रवास करत असतांना त्यांच्या धावत्या रेल्वेतून तोल गेल्याने ते खाली पडले, त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. या विषयी रामानंद नगर पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर पोलिस नाईक अतुल चौधरी यांनी मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात नेला. सुरुवातीला मयताची ओळख न पटल्याने अनोळखी म्हणून नोंद करण्यात आली होती. मात्र मयताजवळ असलेल्या मोबाईलमधील एका क्रमांकावर पोलिसांनी संपर्क साधला असता तो त्याच्या नातेवाईकांचा निघाला. याविषयी त्यांना माहिती दिल्यानंतर मध्यरात्री नातेवाईक जळगावात पोहचले. याबाबत रामानंद नगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. सोमवारी ७ एप्रिल रोजी सकाळी १० वाजता शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस कर्मचारी करीत आहे.

Protected Content