जळगाव प्रतिनिधी । एमआयडीसी परीसरातील ऑटोचे शो रूम फोडून गल्ल्यात ठेवलेले 9 हजाराची रोकड लंपास केल्याची घटना आज सकाळी उघडकीस आले आहे. दरम्यान, चोरी करतांना चोरटे सीसीटीव्हीत कैद झाले आहेत याप्रकरणी एमआयडीसी पोलीसात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत माहिती अशी की, अशोक प्रभाकर चौधरी (वय-73) रा. श्रीराम भवन, एमआयडीसी परीसर शहरातील औद्योगिक वसाहितीतील A -7 मध्ये टिव्हीएस कंपनीचे दुचाकी शो रूम आहे. ऑटो शो रूमाचे कॅशीयर प्रकाश पाटील यांनी 16 डिसेंबर रोजी सायंकाळी 7 वाजता शो रूम बंद करून निघून गेले. रात्री घरी जाण्यापुर्वी कॅशियर प्रकाश पाटील यांनी कॅश काऊंटरला 9 हजार रूपये कुलूप लावून घरी गेले. 17 डिसेंबर रोजी रात्री 12.45 ते 1.15 वाजेच्या दरम्यान अज्ञात दोन चोरटे हातात टॉमी सहाय्याने कॅश काऊंटर तोडतांना सीसीटीव्हीत कैद झाले आहे. त्यांनी 9 हजार रूपयांची रोकड चोरून नेले आहे. याप्रकरणी अशोक चौधरी यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीसात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढीत तपास सहाय्यक फौजदार आनंदसिंग पाटील करीत आहे.