जळगाव प्रतिनिधी । शहरातील सुप्रिम कॉलनी परिसरात अवैध गावठी दारु विक्री करणार्यांवर एमआयडीसी पोलिसांनी छापा टाकला. यात दोन महिलांकडून सुमारे ८ हजार ९५८ रुपयाची गावठी व देशी दारु जप्त करण्यात आली असून त्यांच्याविरुद्ध एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरातील सुप्रिम कॉलनी परिसरात सोमन बलवीर कंजर ही महिला तिच्याा घरासमोरील मोकळ्या जागेत विनापरवाना देशी व गावठी दारुची विक्री करतांना तिला रंगेहाथ पकडण्यात आले. तिच्याकडून १ हजार २४८ रुपयांची देशी दारु व ४ हजार २०० रुपयांची गावठी दारु जप्त करण्यात आली. तसेच दुसर्या छाडीत तयाच परिसरातील रेणुका आझाद भाट ही महिला देखील विनापरवाना दारु विक्री करतांना पोलिसांनी तिच्यावर धाड टाकली. तिच्याकडून १ हजार ३०० रुपयांची देशी दारु व २ हजार ४०० रुपयांची गावठी असे एकूण दोघ धाडीत ८ हजार ९४८ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून दोघांविरुद्ध एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलिस निरीक्षक प्रताप शिकारे यांच्या मार्गदर्शनाखाली जितेंद्र राजपूत, ईमरान अली, हेमंत कळसकर, चंद्रकांत पाटील, आनंदसिंग पाटील, मुदसर काझी, गोविंदा पाटील, सपना येरगुंटला यांच्या पथकाने केली.