जळगाव प्रतिनिधी । सुप्रिम कॉलनी परीसरातील शारदा शाळेसमोर २८ एप्रिल रोजी तरूणावर लोखंडी रॉडने जीवघेणा हल्ला करणाऱ्या संशयित आरोपीला एमआयडीसी पोलीसांनी आज शुक्रवारी दुपारी अटक केली आहे. उद्या शनीवार त्याला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.
आकाश भास्कर विश्वे (वय-३०) रा. सुप्रिम कॉलनी असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. हकीकत अशी की, किरण शामराव चितळे (वय-२२) रा. सुप्रिम कॉलनी हा तरूण २८ एप्रिल रोजी रात्री ९.३० वाजेच्या सुमारास घरगुती भांडण सोडविण्यासाठी आल्याचा राग आल्याने संशयित आरोपी आकाश भास्कर विश्वे, अजय भास्कर विश्वे, सविता भास्कर विश्वे व भास्कर गंगाराम विश्वे सर्व रा. सुप्रिम कॉलनी यांनी बेदम मारहाण केल्याची घटना होती. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. यातील संशयित आरोपी आकाश आणि अजय विश्वे हा घटना घडल्यापासून फरार होते. यातील संशयित आरोपी आकाश विश्वे याला आज शुक्रवारी दुपारी एमआयडीसी पोलिसांनी जळगाव फाट्याजवळून अटक केली आहे. ही कारवाई पोलीस निरिक्षक प्रताप शिकारे यांच्या मार्गदर्शनाखाली हेमंत कळसकर, सुधीर साळवे, चंद्रकांत पाटील, अतुल वंजारी, आनंदसिंग पाटील, मिलिंद सोनवणे, सचिन पाटील आदींनी केली आहे. उद्या शनीवारी त्याला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.