किराणा दुकानातून सात लाख रूपयांच्या गोडेतेलाच्या डब्यांची चोरी

जामनेर प्रतिनिधी | शहरातील बेस्ट किराणा या दुकानातून चोरट्यांनी सात लाख रूपया किमतीचे गोडेतेलाचे डबे चोरून नेल्याची घटना घडली असून या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत वृत्त असे की, येथील पाचोरा रोडवर अभय चंपालाल बोहरा यांचे बेस्ट किराणा हे होलसेल व रिटेल किराणा दुकान आहे. येथून चोरट्यांनी गोडे तेलाच्या डब्यांची चोरी केली. या प्रकाराबाबत मुकेश बोहरा यांनी पोलिस निरीक्षक किरण शिंदे यांना माहिती दिली. शिंदे यांनी सहकार्‍यांसह तत्काळ घटनास्थळ गाठून श्वानपथकाला पाचारण केले. मात्र, पाऊस व वाहनाचा वापर झाल्याने श्वान पथकाचाही उपयोग झाला नाही. याप्रकरणी अभय बोहरा यांनी जामनेर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

Protected Content