Home क्राईम घरात घुसून महिलेचा विनयभंग

घरात घुसून महिलेचा विनयभंग

0
43


पहूर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जामनेर तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या २४ वर्षीय महिलेला बदनामी करण्याची धमकी देत तिचा विनयभंग केल्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबत पहूर पोलीस ठाण्यात बुधवार ७ डिसेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पहूर पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, जामनेर तालुक्यातील मेणगाव येथे २४ वर्षीय महिला आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. मंगळवार ६ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास महिला घरी एकटी असताना गावात राहणारा कृष्णा वसंता गवळी हा महिलेच्या तिच्या घरात अनधिकृतपणे घुसला. महिलेचा हात धरून तिला लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य करत तिचा विनयभंग केला. तसेच वेळोवेळी रस्त्याने तिचा पाठलाग करून बदनामी करण्याची धमकी दिली. हा प्रकार तिने नातेवाईकांना सांगितला, या संदर्भात बुधवारी ७ डिसेंबर रोजी पहूर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून संशयित आरोपी कृष्णा वसंता गवळी यांच्या विरोधात पहूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल प्रशांत विरणारे करीत आहे.


Protected Content

Play sound