राज्यात लवकरच मध्यावधी निवडणुका : शरद पवार

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | राज्यात सत्तांतर झाले असले तरी येत्या सहा महिन्यात मध्यावधी निवडणुका होणार असल्याचे भाकीत करत शरद पवार यांनी आपल्या नेत्यांना निवडणुकीच्या तयारीला लागल्याचे निर्देश दिले आहेत.

राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची बैठक आज पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. यात राज्यातील सद्यस्थितीची आढावा घेण्यात आला. या बैठकीला संबोधीत करतांना शरद पवार यांनी अनेक मुद्यांना स्पर्श केला. यात प्रामुख्याने त्यांनी सर्व नेत्यांनी तयारीला लागल्याचे निर्देश दिले.

या संदर्भात शरद पवार म्हणाले की, राज्यात शिंदे सरकार सत्तारूढ झाले असून ते वरकरणी भक्कम वाटत असले तरी येत्या सहा महिन्यात हे सरकार पडेल. यावेळेस राज्यात मध्यावधी निवडणुका अटळ असून आपण सर्वांनी यासाठी तयार राहण्याची गरज आहे. शिंदे मंत्रीमंडळात अनेकांची इच्छा असून देखील वर्णी लागणार नाही. यामुळे असंतुष्टांची यादी वाढत जाणार असून यातूनच सरकार पडणार आहे. यामुळे आतापासूनच निवडणुकीची तयारी करावी असे निर्देश शरद पवार यांनी दिलेत.

Protected Content