म्हसावद येथून दुचाकीची चोरी; एमआयडीसीत गुन्हा

जळगाव प्रतिनिधी । तालुक्यातील म्हसावद येथून एकाची ३० हजार रूपये किंमतीची मोटारसायकल अज्ञात चोरट्यांनी लांबविल्याची घटना उघडकीला आली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सविस्तर माहिती अशी की, शांताराम मिठाराम बागुल (वय-४८) रा. वाकडी ता.जि.जळगाव हे शेती काम करून आपल्या कुटुंबियांचा उदरनिर्वाह करतात. त्यांच्याकडे ३० हजार रूपये किंमतीची मोटारसायकल (एमएच १९ डीएच ७६१३) वाहन आहे. ५ जुन रोजी त्यांच्या घरासमोर लावलेली मोटारसायकल शक्ती (पुर्ण नाव माहिती नाही) ह.मु. राम देववाडी ता.जि.जळगाव हा काहीही न विचारता दुचाकी घेवून गेला आहे. शांताराम बागुल यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक गणेश शिरसाळे करीत आहे. 

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.