केळी उत्पादकांचे प्रलंबित मागण्यांसाठी कृउबा सभापतींना निवेदन

भडगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । केळी उत्पादक संघाच्यावतीने भडगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती गणेश पाटील व उपसभापती पी. ए. पाटील माजी सभापती रावसाहेब पाटील, माजी नगराध्यक्ष राजेंद्र जिभाऊ यांना केळी उत्पादकांच्या प्रलंबित मागण्यांसाठी निवेदन देण्यात आले.

भडगाव तालुक्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांनी प्रतिकुल परिस्थीतीत दर्जेदार केळीचे उत्पादन घेत आहे. परिसरातील व्यापारी हे मनमानी कारभार करीत आहे. त्यांच्यावर कोणत्या प्रकारचे नियंत्रण नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे सर्व केळी उत्पादक शेतकरी यांनी निवेदन दिले. केळी मालावरील ३ किलोची कट्टी बंद करावी, केळीमालाला बोर्डभावाप्रमाणे दर मिळावा आणि भडगाव, चाळीसगाव आणि पाचोरा साठी स्वतंत्र केळी बोर्ड काढण्यात यावे अशी मागणी उपस्थित केळी उत्पादकांनी केली आहे.

याप्रसंगी शेतकरी केळी उत्पादक संघटनेचे तालुकाध्यक्ष सोमनाथ पाटील, सदस्य विजय पाटील, केळी बागायतदार भाऊसाहेब पाटील, रमेश पाटील, मच्छिंद्र खैरे, दिलीप पाटील, पांढरत स्वदेश पाटील, सुधाकर पाटील, वडजी यांच्यासह आदी उपस्थित होते.

Protected Content