आ. चंद्रकांत पाटलांच्या पाठपुराव्याने शाळा खोल्यांच्या दुरुस्तीसाठी १.०५ कोटी प्राप्त !

मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी| आमदार चंद्रकांत पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे मतदारसंघातील जिल्हा परिषदेच्या शाळांच्या खोल्या दुरूस्तीसाठी १.०५ कोटी रूपयांचा निधी प्राप्त झाला आहे.

राज्याचे बंदरे व खनिकर्म मंत्री दादा भुसे यांच्या कडे आमदार चंद्रकांत पाटील यांनी वेळोवेळी पाठपुरावा केल्याने मुक्ताईनगर मतदार संघातील जिल्हा परिषदेच्या शाळा खोल्या दुरुस्तीसाठी सुमारे १.०५ कोटी रू. निधी च्या तरतुदीसह मंजुरी मिळाली असून दुरवस्था झालेल्या सदरील जिल्हा परिषदेच्या शाळांची दशा पालटणार असल्याने विद्यार्थी व पालक तसेच शिक्षक वृंदांना दिलासा मिळाला आहे.

महाराष्ट्र खनिज विकास निधी अंतर्गत जळगांव जिल्हयातील प्रत्यक्ष / अप्रत्यक्ष खाण बाधित क्षेत्रातील विकास कामांकरिता सन २०२३-२४ या वर्षाकरिता प्रशासकिय मान्यता देणेबाबत महाराष्ट्र शासन,उद्योग, उर्जा व कामगार विभाग,शासन निर्णय क्र. एमएसएमसी-०११८/ प्र.क्र.०२ / उद्योग-९,मंत्रालय, मुंबई ४०० ०३२. दिनांक: १० जूलै, २०२३ अन्वये परिपत्रक जारी झाले आहे. यातील शासन आदेशनुसार खनिज विकास निधी अंतर्गत व्याज स्वरूपात महाराष्ट्र राज्य खनिकर्म महामंडळ मर्या., नागपूर यांचेकडे उपलब्ध असलेल्या रक्कमेपैकी प्रधानमंत्री खनिज क्षेत्र कल्याण योजनेअंतर्गत प्रत्यक्ष/ अप्रत्यक्ष बाधित क्षेत्रातील विविध विकास कामांकरीता सोबत जोडलेल्या यादीनूसार जळगांव जिल्हयातील विविध विकास कामांसाठी रू.२९८७ लक्ष ( रूपये दोन हजार नऊशे सत्याऐंशी लक्ष फक्त मर्यादेतील खर्चाच्या कामांना या आदेशान्वये प्रशासकीय व वित्तीय मान्यता देण्यात येत आहे.

या अनुषंगाने मुक्ताईनगर मतदारसंघातील शाळांसाठी १ कोटी ५ लक्ष रूपयांचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे. मंजूर यादितील अनुक्रमांक नुसार खालील प्रमाणे मतदार संघातील कामे :

१३९) जि.प. उर्दु मुलांची शाळा क्र. २ दुरुस्ती करणे, ता. मुक्ताईनगर, जि. जळगांव (५०.०० लक्ष रू.)

१४०) जि.प. शाळा दुरुस्ती करणे, शेलवड, ता. बोदवड ५.०० लक्ष रू.

१४१ जि.प. शाळा दुरुस्ती करणे, विचवा, ता.बोदवड (५.००लक्ष रू.)

१४२) जि.प. शाळा दुरुस्ती करणे, शेवगे खु., ता. बोदवड (५.०० लक्ष रू.)

१४३) जि.प. शाळा दुरुस्ती करणे, मानमोडी, ता. बोदवड (५.०० लक्ष रू.)

१४४) जि.प. शाळा दुरुस्ती करणे, कांडवेल, ता. रावेर
(५.०० लक्ष रू.)

१४५ जि.प. शाळा दुरुस्ती करणे, भोटा, ता. रावेर (५.०० लक्ष रू.)

१४६) जि.प. मराठी मुलींची शाळा दुरुस्ती करणे, अंतुर्ली, ता. मुक्ताईनगर (५.०० लक्ष रू.)

१४७ ) जि.प उर्दु शाळा दुरुस्ती करणे, अंतुर्ली, ता. मुक्ताईनगर (५.०० लक्ष रू.)
१४८) जि.प. मराठी मुलींची शाळा दुरुस्ती करणे, बेलसवाडी, ता. मुक्ताईनगर (५.०० लक्ष रू.)

१४९)जि.प. मराठी शाळा दुरुस्ती करणे, दुई ता. मुक्ताईनगर, जि. जळगांव (१०.०० लक्ष रू.)

Protected Content