जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या अनुषंगाने जिल्ह्यातील दोन्ही मतदारसंघात मतदानाचा टक्का वाढावा यासाठी मतदार जनजागृती पर कार्यक्रमांवर भर देण्यात येत असून यासाठी आता रोटरी क्लबचे सदस्य देखील पुढे सरसावले आहेत. दोन टप्प्यात जनजागृती पर कार्यक्रमांची आखणी करण्यात आली असून रोटरी क्लबच्या 09 समूहा मार्फत जनजागृती पर मोहीम राबविण्यात येणार आहे.
जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीसाठी मतदानाचा टक्का वाढावा यासाठी जनजागृती पर विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेत समाज घटकातील सर्व स्तरांना सामावून घेण्यात येत आहे.याचाच एक भाग म्हणून मंगळवार दिनांक 7 मे रोजी रोटरी क्लबच्या सदस्यांची विशेष बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त योगेश पाटील व इतर सदस्य उपस्थित होते.या बैठकीत सन 2014 व सन 2019 या वर्षाच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये जळगाव शहरात ज्या भागात मतदानाचे प्रमाण कमी झाले आहे. त्या भागात मतदानाचे प्रमाण कसे वाढवता येईल या विषयावर चर्चा करण्यात आली. यावेळी रोटरी क्लबच्या माध्यमातून दोन टप्प्यात जळगाव शहरात मतदान जनजागृती पर मोहीम राबविण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली.जळगाव शहरातील स्टेट बँक कॉलनी परिसर, मॉडर्न गर्ल हायस्कूल परिसर, आर आरविद्यालयाचा परिसर,महाबळ रोड,महाबळ परिसर,शिवराम नगर, आयोध्या नगर परिसर, शिव कॉलनी परिसर, आदर्श नगर परिसर व गणपती नगर परिसर या भागातील मतदान केंद्रांच्या परिसरातील काही मतदार हे स्थलांतरित असल्याचे दिसून आल्याने ज्या पद्धतीने आपण आपले पारंपारिक सण उत्सव साजरे करतो. सण उत्सवाच्या काळात रहिवाशी आपल्या मूळ गावी परतत असतात त्याचप्रमाणे या भागातील रहिवाशांना देखील गावी बोलावून देशाचा गर्व मतदानाचा पर्व साजरा करण्यासाठी नऊ समूहांनी एकत्रित रित्या काम करून मतदारांना मतदानासाठी प्रोत्साहित करावे असे आवाहन जिल्हा निवडणूक अधिकारी आयुष प्रसाद यांनी केले.
मतदानाचे दिवशी रोटरी क्लबच्या सर्व सदस्यांनी आपल्या कुटुंबीयांसह मतदान करावे व आपल्या कुटुंबातील, परिचयतील, शेजारी यांना मतदानासाठी प्रोत्साहित करून मतदानाला घेऊन जावे. उन्हाचा कालावधी असल्याने शक्यतो सकाळी 07 ते 09 च्या दरम्यान मतदान करावे. मतदान करून झाल्यानंतर रोटरी क्लबच्या सर्व सदस्यांनी आपल्या कुटुंबीयांसह रोटरी क्लब येथे जमून सामूहिक राष्ट्रगीताचे गायन करावे व त्यानंतर सेल्फी काढावा. यामुळे मतदारांमधील एक मोठा घटक मतदान प्रक्रियेत सहभागी झाला व इतर मतदारांमध्ये देखील मतदान करण्याविषयी भावना निर्माण होईल व जनजागृती देखील होईल. जनजागृती चे छायाचित्र 9209284010 या जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या भ्रमणध्वनी क्रमांकावर पाठवावेत असे आवाहन देखील यावेळी करण्यात आला
मतदार जनजागृती साठी सरसावले रोटरी क्लबचे सदस्य, दोन टप्प्यात केली जनजागृतीपर कार्यक्रमाची आखणी
8 months ago
No Comments