जळगाव, प्रतिनिधी | जळगाव ग्रामीण मतदार संघातील अपक्ष उमेदवार चंद्रशेखर अत्तरदे यांच्या प्रचारार्थ आज (दि.१७) दिवसभर प्रचार दौरे आणि सायंकाळी दोन सभा असा भरगच्च कार्यक्रम आखण्यात आला आहे.
सकाळी ७.०० वाजेपासून त्यांच्या प्रचार दौऱ्याला आसोदा येथून प्रारंभ होणार असून ९.०० वाजता भोलाणे, १०.०० वाजता देऊळवाडे, ११.०० व. सुजदे, दुपारी १.०० वा. जळगाव खु., २.०० वा. बेळी, ३.०० वा. निमगाव तर ४.०० वा. नशिराबाद येथे ते प्रचार रॅली काढणार आहेत.
त्यानंतर सायंकाळी ५.०० ते ७.०० दरम्यान शिरसोली येथे तर ७.०० ते ९.०० दरम्यान नशिराबाद येथे त्यांची प्रचारसभा होणार आहे. यावेळी परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन त्यांच्या मित्र परिवारातर्फे करण्यात आले आहे.