पाचोऱ्यात शिव संवाद अभियानांतर्गत विविध भागात बैठकींचे आयोजन

पाचोरा प्रतिनिधी । पाचोरा शिवसेनेच्या वतीने शहरात विविध प्रभागात शिव संवाद अभियानांतर्गत बैठकांचे सत्र सुरू असून त्याअंतर्गत त्या-त्या प्रभागातील नागरिकांनी या कार्यक्रमात मांडलेल्या समस्या समजून घेऊन नगरपालिकेच्या व आ. किशोर पाटील यांच्यावतीने त्या समस्यांच्या सोडवणुकीसाठी नियोजन केले जात आहे.

शहरातील प्रभाग क्रमांक सहा मधील नागसेन नगर भागातील महिला भगिनींनीसह पुरुष बाधवांसाठी सार्वजनिक शौचालय तर तरुणांसाठी व्यायाम शाळेच्या वर्षानुवर्षे प्रलंबित राहिलेल्या विषयावर मार्ग काढत परिसरातील खाजगी जागा विकासाकाकडून जागा बक्षिसपत्र करून घेत दोन्ही जागांचे आगामी महिनाभरात भूमिपूजन करण्याचे आश्वासन मिळाल्याने शिवसेनेच्या वतीने आयोजित शिवसंवाद फलदायी ठरला आहे. या निर्णयाने परिसरातील नागरिक सुखावले असून महिलांनी व तरुणांनी आमदार किशोर पाटील, शिवसेना नेते मुकुंद बिल्दीकर, नगराध्यक्ष संजय गोहिल, जागा विकासक प्रेमनारायण तिवारी यांचेसह पत्रकार प्रवीण ब्राह्मणे यांचे आभार व्यक्त केले आहेत.

बैठकीला नगराध्यक्ष संजय गोहिल, उद्योजक मुकुंद बिल्दीकर, जागा मालक प्रेमनारायन तिवारी, मनोज तिवारी, शहर प्रमुख किशोर बारावकर, पत्रकार प्रवीण ब्राह्मणे, युवा सेनेचे संदीप राजे पाटील, सुमीत सावंत, विशाल पवार, आकाश पाटील, रवींद्र बाळदकर, राजेंद्र केदार, माजी नगरसेवक अविनाश सावळे यांची मंचावर उपस्थिती होती.

यावेळी राजेंद्र खर्चाने, आकाश खैरनार,अनिल लोंढे, माया केदार, अमोल पवार अनुराग खेडकर, भय्या खेडकर यांनी या भागातील प्रमुख समस्या कथन केल्या. यात शौचालय, व्यायाम शाळा, भूमिगत गटारी, पथदिवे, नाल्या, स्वच्छता, पुराच्या पाण्याचे नियोजन, खुले भूखंड  विकास कामे आदी विषय समोर आले. सर्व समस्यां समजून हेत त्या सोडवणुकीचे आश्वासन देत मुकुंद बिल्दीकर यांनी आ. किशोर पाटील व पाचोरा नगरपालिकेच्या वतीने सुरू असलेल्या व प्रस्तावित  विकास कामांची माहिती दिली.

बैठकीला नागसेन नगर भागातील संदीप गायकवाड, लखन वाघ, दीपक खैरे, गायत्री सातदिवे, चंद्रकांत नरवाडे, निलेश जाधव,सूरज महिरे, अनिल जोगळे, छन्नु सपकाळे, किरण सोनवणे, आकाश बनसोडे, अशोक गायकवाड, राजू सोनवणे, संतोष खैरनार, विशाल मोरे, तात्या सोनवणे,विशाल मोरे, गौरव साठे, सागर वाघ यांची तर जनता वसाहत भागातील मिलिंद तायडे, विश्वनाथ भिवसने, विजय गायकवाड, रवींद्र खैरे, किरण अहिरे, सागर अहिरे, मयूर ब्राह्मणे, सचिन नंनोरे, सचिन केदार, आकाश थोरात, विकास थोरात, तपन शिरसाट, नवीन ब्राह्मणे, विशाल सावळे, शुभम खर्चाने, रोहित बाळदकर, तन्मय ब्राह्मणे, रवींद्र अहिरे, सोनल बागुल, आकाश बनसोडे यांची उपस्थिती होती.

 

Protected Content