स्थिर सरकारसाठी ना. गुलाबराव पाटील यांच्या निवास्थानी आरपीआयचे आंदोलन (व्हिडिओ)

पाळधी ता. धरणगाव लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | रिपब्लीकन पार्टी ऑफ इंडियाच्या आठवले गटाच्यावतीने पाणीपुरवठा मंत्री तथा पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या निवास्थानी भाजप-शिवसेना- आरपीआयची यांनी राज्यात स्थिर सरकार देण्याकरिता महानगर अध्यक्ष अनिल अडकमोल, जिल्हा सचिव भरत मोरे, यांच्या नेतृत्वाखाली निदर्शने करून पालकमंत्री ना. पाटील यांच्या स्वीय सहाय्यक यांना निवेदन देण्यात आले.

 

निवेदनाचा आशय असा की, २० जून रोजी राज्य विधानपरिषद निवडणूकीनिकालानंतर दि. २१जून रोजी मध्यरात्रीपासून राज्याचे नगरविकासमंत्री तथा शिवसेनेचे जेष्ठ नेते ना. एकनाथ शिंदे हे आपल्या ३५ ते ४० आमदारांसह त्यात प्रामुख्याने कॅबिनेट मंत्री ना. गुलाबराव पाटील, दादा भुसे, राज्य मंत्री अब्दुल सत्तार, संदिपान भुमरे, बच्चू कडू यांच्यासह जिल्हयातील चिमणराव पाटील, किशोर पाटील व सौ. लताताई सोनवणे यांच्यासह अपक्ष आमदार समावेश आहे. त्यानंतर शिवसेनेत अंतर्गत मोठी फुट पडली असून हिन्दुत्वाच्या मुद्यावर व आर्थिक निधीच्या मुद्यावर ना. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेने सत्तेतील राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस यांची साथ सोडून भारतीय जनता पार्टी सोबत सत्ता स्थापन करावी अशी भूमिका घेतल्याने राज्यातील ठाकरे सरकार हे अल्पमतात आलेसारखं एकंदरीत दिसत आहे. राज्यात कोरोनाचा संसर्ग हा वाढत असून यांचे गांभीर्य लक्षात घेता तसेच राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता तथा पालकमंत्री जळगाव जिल्हा ना. गुलाबराव पाटील यांनी जिल्हयात बराच प्रमाणे जिल्हा नियोजन समितीच्या माधमातून निधी आणून लोकहितार्थ कामे केली. त्यात जळगाव शहर महानगरपालीकेला रस्त्यांकरीता मोठा निधी उपलब्ध करुन आज शहरातील काही भागात रस्त्यांचे काम झालेले दिसत आहे. त्यामुळे राज्याच्या तथा जिल्हयाच्या सर्वांगिक विकासासाठी भारतीय जनता पार्टीचे देवेद्र फडणवीस, गिरीश महाजन व दिवंगत बाळासाहेब ठाकरे, कर्मविर आनंद दिघेसाहेब यांच्यावर प्रेम करणारे शिंदेगटातील आमदारांनी लवकरात लवकर राज्यात सरकार स्थापन करुन राज्यातील सर्वसामान्य जनतेला सक्षम व स्थिर सरकार देऊन शेतकरी, कष्टकरी, कामगार, कर्मचारी यांच्या हितार्थ निर्णय घ्यावे. याकरीता आज रिपब्लीकन पार्टी ऑफ आठवले गटाच्या वतीने ना. गुलाबराव पाटील यांच्या पाळधी येथील निवासस्थानी लोकशाही मार्गाने एक दिवशीय निदर्शने महानगराध्यक्ष अनिल अडकमोल, जिल्हा सचिव भरत मोरे, यांच्या नेतृत्वाखाली राज्यात लोकाभिमुख सक्षम व स्थिर सरकार कसे येईल याकरीता आज रोजी आंदोलन करण्यात आले. याप्रसंगी मिलींद सोनवणे, भिमराव सोनवणे,सागर सपकाळे, विलास सोनवणे, प्रताप बनसोडे, अक्षय मेघे, भरत मोरे, अनिल लोंढे, बबलू भालेराव, किरण अडकमोल अशोक धामने आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/1201900330634074

Protected Content