मातोश्रीवर सेना नवनिर्वाचित आमदारांची बैठक ; मोबाईलवर बंदी

matoshri

मुंबई प्रतिनिधी । शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज शिवसेना आमदारांची बैठक बोलावली आहे. या बैठकीत उद्धव ठाकरे सरकार स्थापनेबद्दल आपला निर्णय जाहीर करु शकतात. दरम्यान या बैठकीसाठी शिवसेना आमदार मातोश्रीवर पोहोचण्यास सुरुवात झाली असून आमदारांच्या मोबाईल फोनवर बंदी घालण्यात आली आहे. तसेच पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

यानंतर शिवसेनेच्या आमदारांशी इतर कोणाचाही संपर्क होऊ नये म्हणून खबरदारी घेण्यात येत आहे. त्यासाठी शिवसेनेच्या आमदारांची रवानगी नरिमन पॉईंट इथल्या हॉटेल ट्रायडंटमध्ये होणार आहे. आमदार फुटीच्या भीतीने शिवसेना हे पाऊल उचलणार असल्याचे कळते आहे. सत्ताधाऱ्यांनी सर्व पक्षांचे आमदार फोडण्याचा गेल्या काही दिवसात प्रयत्न केल्याचा आरोप शिवसेना नेते संजय राऊत यांनी केला होता. त्यासाठी भाजपने गुंडांचा, धमक्यांचा वापर केल्याचे देखील राऊत यांनी सांगितले होते. त्यामुळे शिवसेनेने सावध पवित्रा घेतला आहे.

Protected Content