महसूल चतुर्थ सरकारी कर्मचारी संघटनेची अल्पबचत भवनात बैठक (व्हिडीओ)

जळगाव प्रतिनिधी । जिल्हा महसूल चतुर्थ सरकारी कर्मचारी संघटनेच्या विविध मागण्यांसाठी २५ नोव्हेंबर रोजी मुंबईत मोर्चा काढण्यात येणार आहे. यासंदर्भात आज शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयात अल्पबचत भवानात बैठक घेण्यात आले.

या आहेत मागण्या

सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या मुलाला सेवेत सामावून घ्यावे, मेडिकल अनफिट झालेल्या कर्मचाऱ्यांच्या मुलांना कामावर घ्यावे, अनुकंपा तत्त्वावरील कर्मचाऱ्यांच्या मुलांना सामावून घ्यावे, खाजगीकरण रद्द करावे, रिक्त पद सरळ सेवेने तात्काळ भरावे, जुनी पेन्शन योजना लागू करावी यासह अन्य मागण्यांसाठी २५ नोव्हेंबर रोजी मुंबई येथे मोर्चा काढण्यात येणार आहे. यासंदर्भात आज शुक्रवारी १२ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील अल्पबचत भवनात संघटनेची बैठक घेण्यात आली.

यापुर्वी या मागण्यांसाठी शासनाला निवेदन देऊनही शासन या मागण्यांकडे दुर्लक्ष करीत आहे. सर्व संघटनेच्या सदस्यांनी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील दौरे करून चतुर्थश्रेणी असलेल्या कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले जात आहे. मोर्चाची तयारी सुरू केली असून याला अत्यंत चांगला प्रतिसाद मिळात आहे. शासनाने या मोर्चाची दखल घेऊन मागणी मान्य करावी  अशी मागणी संघटनेचे कार्याध्यक्ष भिकू साळुंके व संघटक प्रकाश घाडगे यांनी केले आहे. या सह संघटक प्रसंगी रमेश भोसले, कृषी विभागाचे बाबा जाधव, विभागीय महिला उपाध्यक्षासारिका सोनवणे, आप्पा तायडे, दिलीप भंडारी आदी उपस्थिती होती.

Protected Content