समरसता महाकुंभ आयोजनाबाबत प्रशासकीय अधिकाऱ्यांची बैठक

फैजपूर – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | समरसता महाकुंभ आयोजना संदर्भात आज दि. ८ रोजी दुपारी श्री निष्कलंक धाम वढोदे येथे प्रशासकीय अधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी सुरळीत रस्ते व पार्किंग सह येणाऱ्या भाविकांना प्रशासनाच्या वतीने अपेक्षित सुविधांसाठी या बैठकीत संबंधित अधिकारी यांच्याशी चर्चा झाली.

वढोदा येथील निष्कलंक धाम परिसरात डिसेंबर महिन्याच्या दि २९,३०,३१ या तीन दिवस आयोजीत करण्यात आलेल्या समरसता महाकुंभाच्या तयारीला आता वेग आलेला आहे. या भागातील साफसफाईची कामे करण्यात येत असून निष्कलंकधामचे उर्वरित कामेही अंतीम टप्प्यात आलेली आहे. आजपासून रस्त्यांची कामे देखील सुुरू झाली असून याप्रसंगी महामंडलेश्‍वर जनार्दन हरीजी महाराज यांनी पूजन केले.

अमोल जावळे, आदींसह मान्यवरांची उपस्थिती होती.दरम्यान आज दुपारी श्री निष्कलंक धाम वढोदे येथे प्रशासकीय अधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती.यावेळी महामंडलेश्वर जनार्दन हरी जी महाराज यांनी समरसता महाकुंभच्या आयोजनाची सविस्तर माहिती दिली. सांप्रदायिक, सामाजिक समरसता निर्माण व्हावी तसेच सर्व जाती-धर्माचे लोक प्रथम माणूस आहे या उद्देशाने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याचे जनार्दन हरीजी महाराज यांनी सांगितले.

यावेळी निष्कलंक धाम वडोदा येथे येणाऱ्या सर्व भाविकांची कोणत्याही प्रकारे गैरसोय होणार नाही, यासाठी आमोदा, व सावदा या बाजूंनी पार्किंगची व्यवस्था, भोजन व्यवस्था, मुख्य पेंडाल मध्ये येण्या जाण्याचा मार्ग, वेगवेगळ्या सेक्युरिटीसह सीसीटीव्ही कॅमेरे याबाबत प्रशासकीय अधिकाऱ्यांसह आ. शिरीष चौधरी यांच्याशी चर्चा विनिमय करून माहिती दिली. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सर्व विभागातील अधिकाऱ्यांनी सहकार्य करावे असे आवाहन जनार्दन हरीजी महाराज यांनी केले आहे.

या बैठकीला आमदार शिरीष चौधरी यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या बैठकीत प्रांताधिकारी कैलास कडलग, डी वाय एस पी डॉ. कुणाल सोनवणे, यावल सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अनिल तडवी, तहसीलदार महेश पवार, विजवितरणचे कार्यकारी अभियंता गोरक्षनाथ सपकाळे, मुख्याधिकारी वैभव लोंढे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सिद्धेश्वर आखेगांवकर, पी.एस.आय मकसुद्दीन शेख, मोहन लोखंडे, फैजपुर मंडळ अधिकारी हनिफ तडवी, आमोदा विजवितरण कंपनीचे कनिष्ट अभियंता मयूर भंगाळे, कार्यकारी अभियंता आर. टी. फिरके, वढोदा तलाठी हेमाताई सांगोळे, सरपंच नदंकिशोर सोनवणे, उपसरपंच सुनील बोदडे, ग्रा पं सदस्य सचिन झालटे, यावल आरोग्य विभागाचे आरोग्य पयर्वक्षक जयंत पाटील आदी अधिकारी व पत्रकार उपस्थित होते.

 

Protected Content