जळगाव प्रतिनिधी । राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी मीनाक्षी रमेश चव्हाण यांची फेरनियिक्ती झाली. ही नियुक्ती महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा वंदना चौधरी यांनी केली.
याबाबत मीनाक्षी चव्हाण यांना पक्षाचे जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील व वंदना चौधरी यांच्याहस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले. चव्हाण यांचे सामाजिक, राजकीय कार्य, वैचारिक विषयावरील उल्लेखनीय लेखनाचा गौरव पक्षाचे जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील यांनी केला. या वेळी पक्षाचे जिल्हा सरचिटणीस अशोक पाटील, माजी नगरसेवक अशोक लाडवंजारी, सुनील माळी, अरविंद मानकरी उपस्थित होते. मीनाक्षी चव्हाण या सिंगल वुमन फाउंडेशनच्या संस्थापक अध्यक्षा आहेत. तर त्या नंदुरबार जिल्ह्यातील महिला आघाडीच्या निरीक्षक पदाची जवाबदारी देखील सक्षमपणे सांभाळत आहे. त्यांनी कोरोना काळात पित्रुछत्र हरवलेल्या एका गरजू मुलीच्या शिक्षणासाठी आर्थिक मदत केली. तसेच विधवा, एकल महिलांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्नशिल असल्याचेही त्यांनी सांगितले.