मेडीकल असोसिएशन अद्ययावत वास्तूच्या बांधकामाचे भूमीपूजन

पारोळा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । पारोळा तालुका मेडीकल असोसिएशनच्या अद्ययावत वास्तूच्या बांधकामाचे भूमिपूजन सोहळा जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अमोल पाटील यांच्याहस्ते रविवारी करण्यात आले.

पारोळा तालुका मेडीकल असोसिएशनचे पदाधिकारी व सदस्यांनी इतर शहरांप्रमाणे पारोळा शहरात देखील मेडीकल असोसिएशनची हक्काची वास्तु साकारण्यात यावी, या मागणी २५ सप्टेंबर रोजी जळगांव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष अमोल पाटील यांची भेट घेतली होती. या भेटी वेळी आ. चिमणराव पाटील यांच्या माध्यमातुन लवकरच आपणांस केमिस्ट भवन इमारत बांधकामासाठी निधी उपलब्ध करून दिला जाणार असल्याचे अमोल पाटील यांनी ठोस आश्वासित केले होते.

त्याची वचनपुर्ती म्हणुन रविवारी ५ नोव्हेंबर रोजी पारोळा मेडीकल असोसिएशनच्या अद्ययावत वास्तु बांधकामाचा भव्य भुमीपुजन सोहळा अमोल पाटील यांच्या शुभहस्ते पार पडला. यावेळी तालुकाप्रमुख मधुकर पाटील, मा.नगराध्यक्ष सुरेंद्र बोहरा, मा.नगरसेवक मनिष पाटील यांचेसह पारोळा तालुका मेडीकल असोसिएशनचे सर्व पदाधिकारी, सदस्य व पारोळा तालुक्यातील औषध विक्रेते उपस्थित होते.

Protected Content