जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | महापौर जयश्री महाजन यांनी निधी मिळण्यावरून पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्यावर केलेल्या आरोपांबाबत भारतीय जनता पार्टी आणि बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे नगरसेवकांकडून अजिंठा विश्रामगृह येथे पत्रकार परिषद घेवून महापौरांनी केलेले आरोप जिल्हा नियोजन समितीमर्फे देण्यात आलेल्या निधीचा तक्ता दाखवून आरोप बिनबुडाचे असल्याचे स्पष्ट करत खोडून काढण्यात आले.
शिंदे गट व भाजपा नगरसेवकांनी आयोजित पत्रकार परिषदेत नगरसेवक विशाल त्रिपाठी, ॲड. दिलीप पोकळे, नगरसेवक गणेश सोनवणे, नगरसेवक चेतन सनकत, नगरसेवक नवनाथ दारकुंडे, नगरसेवक राजेंद्र घुगे पाटील, नगरसेवक जितेंद्र मराठे, बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे निलेश पाटील आदी उपस्थित होते. शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या महापौर जयश्री महाजन यांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्यावर आरोप करत जळगाव शहराचा विकासकामे होण्यासाठी निधी देण्यास नकार दिला आहे. शिवाय आपल्याला शिंदे गटात जाण्यासाठी वरिष्ठांसह इतरांकडून दबाव टाकला जात आहे असा आरोप केला होता. या आरोपाला प्रतिउत्तर देण्यासाठी भारतीय जनता पार्टी आणि बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे नगरसेवकांनी मंगळवारी ८ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता शहरातील अजिंठा विश्रामगृह येथे पत्रकार परिषद घेवून निधी संदर्भात माहिती दिली. याप्रसंगी नगरसेवक ॲड. दिलीप पोकळे यांनी पत्रकार परिषदेत बोलतांना सांगितले की, शिवसेनेत फूट पडण्याच्या आगोदर महापौर जयश्री महाजन यांनी पालकमंत्री यांनी निधी दिल्याचे सांगितले होते. परंतू आता शिंदे सरकार आल्यानंतर शहराचा विकास कामांसाठी पालकमंत्री निधी देत नाही असा आरोप पुर्णपणे चुकीचे आहे असे सांगत. शहरातील विकास कामांसाठी आतापर्यंत कोणत्या प्रभागाला, कोणत्या वार्डात किती निधी गेला याची संपुर्ण तपसील सांगितला. शहराचा विकासासाठी सर्वजणांनी एकत्र येवून काम करायचे आहे. असे बेछुट आरोप सहन करणार नाही. असे उपस्थित नगरसेवकांनी पत्रकार परिषदेत सांगितले. निलेश पाटील यांनी महापौरांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी शहराच्या विकासासाठी निधी उपलब्ध करून दिला असल्याचे मान्य केले होते असे स्पष्ट केले. महापौरांवर कोणीही दबाव टाकत नसून असा दबाव आणला जाता आहे यांचे पुरावे त्यांनी सादर करण्यावेत असे खुले आव्हान त्यांनी महापौरांना दिले. मनपा सत्ताधाऱ्यांचा प्रशासनावर वचक नसल्यानेच निधीचा व्यवस्थितपणे विनियोग होत नसल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. महापालिकेत सर्व कामे मॅनेज होत असून अधिकारी आणि ठेकेदारांकरून कामे करवून घेण्यात सत्ताधार्यांना अपयश आले आहे. महापालिकेतील सत्ताधारी अक्षरश: हतबल झाल्याचा आरोप ॲड. दिलीप पोकळे यांनी केला.
भाग १
भाग २