पुणे-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | आगामी विधानसभा निवडणूक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली लढविली जाईल, अशी माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी येथे दिली. विसर्जन मिरवणुकीला प्रारंभ होण्यापूर्वी अजित पवार यांनी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचे दर्शन घेतले. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.
मुख्यमंत्री कोण होणार, यासंदर्भात त्यांच्याकडे विचारणा केली असता ते म्हणाले की, आपला नेता मुख्यमंत्री व्हावा, असे प्रत्येक कार्यकर्त्याला वाटत असते. निवडणुकीत ज्या पक्षाला १४५ जागा मिळतील त्या पक्षाचा मुख्यमंत्री होईल. मुख्यमंत्री कोणाला करायचे याचा निर्णय जनतेच्या हाती असतो. राज्यात महाविकास आघाडीचे प्रथमच सरकार आणण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. महायुतीचे सरकार आल्यानंतर तिन्ही पक्षातील नेते एकत्र बसून निर्णय घेतील. आगामी निवडणूक मुख्यमंत्री एकनाश शिंदे यांच्या नेतृत्वाखाली लढविल्या जातील.