मुंबई मेट्रो ३ बाबत मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | ‘कुलाबा – वांद्रे – सिप्झ मेट्रो ३’ मार्गिकेतील आरे – बीकेसी दरम्यानचा पहिला टप्पा वाहतूक सेवेत दाखल करण्याच्या दृष्टीने मेट्रोचे आयुक्त, मेट्रो रेल्वे सुरक्षा (सीएमआरएस) यांच्याकडून प्रमाणपत्र मिळणं बाकी आहे. असं असतानाही विधानसभा निवडणुकीच्या आधी सर्व प्रमाणपत्र मिळवून मेट्रो सुरू करण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न असल्याचा आरोप विरोधकांकडून होत आहे. अशातच, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकतीच घोषणा केली आहे की बीकेसी – आरेदरम्यानचा मेट्रो ३ चा पहिला टप्पा सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस सुरू केला जाईल. तर दुसऱ्या टप्प्यातील वाहतूक पुढच्या वर्षी सुरू केली जाऊ शकते. ३३.५ किमी लांबीची मेट्रो लाईन ३ ही मुंबईच्या उत्तर व दक्षिण भागाला जोडणारी महत्त्वपूर्ण सार्वजनिक वाहतूक व्यवस्था आहेत.

मुंबई मेट्रो ३ मुंबईतील एकूण ६ व्यावसायिक उपनगरे, ३० कार्यालयीन क्षेत्रे, १२ मोठ्या शैक्षणिक संस्था, ११ प्रमुख रुग्णालये, १० वाहतूक केंद्रे व मुंबईतील दोन्ही विमानतळांना (देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय) जोडणार आहे. मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनकडून (एमएमआरसी) ३३.५ किमी लांबीच्या भुयारी ‘मेट्रो ३’चे काम सुरू आहे. या मार्गिकेतील आरे – बीकेसी दरम्यानच्या पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण झाले आहे. आता केवळ मेट्रो आयुक्त, मेट्रो रेल्वे सुरक्षा (सीएमआरएस) यांच्याकडून चाचण्या करून घेत प्रमाणपत्र घेणे बाकी आहे. ही प्रक्रिया सुरू झाली आहे. ही प्रक्रिया पूर्ण होऊन प्रमाणपत्र मिळाल्यानंतर पहिल्या टप्प्याचे लोकार्पण होणार आहे. सीएमआरएस प्रमाणपत्र मिळाल्याशिवाय मेट्रो वाहतूक सेवेत दाखल करताच येत नाही.

Protected Content