मेहरूण परिसरात महापौर व उपमहापौर यांनी नागरीकांशी साधला संवाद (व्हिडिओ)

जळगाव प्रतिनिधी । शहरातील मेहरूण परिसरातील आदिशक्ती चौक, विश्वकर्मा नगर, हनुमान नगर, रामेश्वर कॉलनी परिसरात महापौर जयश्री महाजन आणि उपमहापौर कुलभूषण पाटील यांनी आज भेट घेवून नागरीकांच्या समस्या जणून घेतल्या असता स्थानिक रहिवाशी यांनी घंटागाडीची अनियमितता, गटारी साफसफाई आणि विद्यूत तारांसंदर्भात तक्रारी केल्यात. याबाबत संबंधित विभागाला समस्या निवारणाच्या सुचना देण्यात आल्या.

शहरातील मेहरूण नाला सफसफाईला भेट दिली असता मेहरूण परिसरातील आदिशक्ती चौक, विश्वकर्मा नगर, हनुमान नगर, रामेश्वर कॉलनी या भागात जावून नागरीकांशी संवाद साधला. त्यावेळी नागरीकांनी समस्यांचा महापौर व उपमहापौर यांच्यापुढे पाढा वाचला. गेल्या तीन दिवसांपासून कचरा उचण्यासाठी घंटागाडी येत नाही, गटारींची स्वच्छता होत नसल्याची तक्रार स्थानिक रहिवाशी यांनी महापौर जयश्री महाजन आणि उपमहापौर कुलभूषण पाटील यांच्याशी संवाद साधतांना केल्या. तक्रारींची दखल घेत महापौर व उपमहापौर यांनी संबंधित विभागाला स्वच्छता व घंटागाडी संदर्भात सुचना दिल्या. शिवाय याच परिसरात गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून विद्यूत तारा लोंबकळत असल्याने महावितरण विभागाच्या कर्मचाऱ्यांना अतिरिक्त इलेक्ट्रिक खंबा उभारण्याचे सांगण्यात आले. परिसरात असलेल्या सर्व समस्यांचे लवकरच निवारण करण्यात येईल असे आश्वासन महापौर व उपमहापौर यांनी स्थानिक रहिवाश्यांना दिलेत.

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/294205522341769

Protected Content