मयांकचे द्विशतक ; भारताकडे ३४३ धावांची आघाडी

India vs Bangladesh teem

इंदूर वृत्तसंस्था । बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या कसोटीत भारताने पहिला डाव ६ बाद ४९३ धावांवर घोषित केला. मयांकने धडाकेबाज द्विशतक लगावले. पहिल्या डावात भारताने तब्बल ३४३ धावांची आघाडी घेतली असून कसोटीचा आज तिसरा दिवस आहे. बांगलादेशचा पहिला डाव अवघ्या १५० धावांत आटोपला होता.

store advt

भारताच्या डावात सलामीवीर रोहित पहिल्याच दिवशी स्वस्तात बाद झाला. दुसऱ्या दिवसाचा खेळ सुरू झाल्यावर मयांक अग्रवाल आणि चेतेश्वर पुजारा दोघांनी आपली अर्धशतके पूर्ण केली. पण त्यानंतर पुजारा ५४ धावांवर बाद झाला. पाठोपाठ विराटही शून्यावर माघारी परतला. पण रहाणेच्या साथीने अग्रवालने डाव सावरला. रहाणे ८६ धावांवर बाद झाला, पण अग्रवालने दमदार द्विशतक ठोकले. मात्र द्विशतकानंतर तुफान फटकेबाजीच्या प्रयत्नात तो २४३ धावांवर बाद झाला. मयांक बाद झाल्यावर जाडेजाने तुफान फटकेबाजी केली. सध्या जाडेजा ६० तर उमेश यादव २५ धावांवर खेळत आहे. पहिल्या दिवशी भारताच्या डावात सलामीवीर रोहित शर्मा स्वस्तात बाद झाला होता. बांगलादेशकडून अबू जायेदने ४ तर मेहिदी हसन मिराज आणि एबादत यांनी १-१ गडी बाद केला.

error: Content is protected !!