शेतकऱ्यांच्या विविध मागण्याबाबत मविआचे तहसीलदारांना निवेदन

रावेर/यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | रावेर-यावल तालुक्यातील शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नाबाबत महाविकास आघाडीतर्फे आज १५ ऑक्टोबर रोजी तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. या मागण्या पुढीलप्रमाणे-

1) ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना हेक्टरी एक लाख रुपये मदत द्यावी
2) वीज बिल माफी ची मर्यादा 7.50 Hp वरून 15 Hp पर्यंत वाढवून शेतकऱ्यांचे वीज बिल पूर्णपणे माफ करावे
3) शेतकऱ्यांची पिक विमा रक्कम त्वरित शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावी
4) विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्तीची रक्कम लवकर मंजूर करून द्यावी
5) गुरांसाठी असलेल्या गोठा अनुदान व ठिबक सिंचन अनुदानाची रक्कम तत्काळ शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावी
6) शेतकऱ्यांसाठी अनुदान ठरलेली डीबीटी योजना गेल्या एक वर्षापासून बंद असून ते पुन्हा तत्काळ सुरू करावी
7) मागील वर्षे केळी पिक विमा मधील कागदपत्र पूर्तता करून ६६८६ मंजूर केलेल्या प्रकरणाची रक्कम तत्काळ शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावी
8 रावेर तालुक्यातील विविध गावातील घरकुल मंजूर असून त्यांना 1 ते 2 हप्ते लाभार्थ्यांना दिले गेले आहे बाकीचे अनुदान न आल्यामुळे त्यांना त्रास सहन करावा लागत आहे.

त्याचे उर्वरित अनुदान तात्काळ अदा करावे. या प्रश्नांसाठी तहसीलदार कार्यालय रावेर येथे तहसीलदार बंडू कापसे साहेब यांना महाविकास आघाडीच्या वतीने निवेदन देण्यात आले यावेळी आमदार शिरीषदादा चौधरी,तालुका काँग्रेस कमेटी अध्यक्ष डॉ राजेंद्र पाटील, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे तालुका अध्यक्ष किशोर पाटील माजी पंचायत समिती सदस्य योगेश सोपान पाटील,श्री धनंजय शिरीष चौधरी पीपल्स बँक चेअरमन सोपान साहेबराव पाटील रावेरचे माजी नगराध्यक्ष हरिषशेठ गणवाणी, प्रल्हाद बोडे, सुनील कोंडे,  नितिन पाटील राहुल पाटील, मंजूर टेलर, भुपेश जाधव, रामदास लहासे व महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Protected Content