फैजपूर – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | सार्वजनिक बांधकाम विभाग विभाग क्र.२ जळगांव ५०/५४ निधी अंतर्गत मंजूर झालेला मौजे पिंपरूळ फैजपूर रस्त्याचे भूमिपूजन आज आ. शिरीष चौधरी ह्यांनी केले.
या रस्त्याची अवस्था खूप खराब झाली होती. शेतकरी बांधवाना शेतमालने आन करण्यासाठी खूप अडचणी चा सामना करावा लागत होता खूप दिवसापासून शेतकरी बांधवांची व गावकऱ्यांची या रस्त्या साठी मागणी होती आ. चौधरींनी सतत या रस्त्या साठी पाठपुरावा करून मंजुरी मिळवली लवकरच कामाला सुरवात होणार आहे.
या भूमिपूजन सोहळ्या प्रसंगी उपस्थित फैजपूर चे माजी नगराध्यक्ष मिलिंद वाघळूदे, नगरसेवक कलिंम खान मण्यार, चि. धनंजय चौधरी, माजी नगरसेवक रामा चौधरी, पप्पू चौधरी, बबलू महाजन, पिंटू हंसकर, रियाज मेम्बर, पिंपरूळ सरपंचां मंगला योगेश कोळी, नंदकिशोर श्रीधर चौधरी, माजी सरपंच सुभाष सुकदेव पाटील, संजय अरुण तायडे, योगिता संदीप सुरवाडे, खुशाली जितेंद्र जंगले, शकुंतला चंद्रकांत पाटील, हरिष चौधरी पोलीस पाटील, ज्ञानदेव चौधरी, कुंदन चौधरी, योगेश कोळी, राहुल चौधरी, फैजपूर व पिंपरूळ येथील ग्रामस्थ शेतकरी बांधव व कार्यकर्ते उपस्थित होते.