उत्तर प्रदेशमधील हाथरस घटनेच्या निषेधार्थ पारोळ्यात भव्य रॅली

पारोळा प्रतिनिधी । उत्तरप्रदेशातील हाथरस येथील दलित तरुणीची निर्दयी हत्या झाली असून तरुणीस न्याय मिळावा, या निषेर्धात पारोळा भीम आर्मी संघटनेसह इतर समाज आणि १६ सामाजिक संघटनेच्या मार्फत आज शहरात भव्य रॅली काढण्यात आली.

शहरातील विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून आणि पीडित मुलीस श्रद्धांजली वाहून रॅलीला सुरवात करण्यात आली. बाजार पेठ मार्गे जात छत्रपती शिवाजी महाराजांना पुष्पहार अर्पण करून पारोळा पोलीस स्टेशन येथे तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले. या रॅलीमध्ये ‘बेटी हम शर्मीदा है, तेरे कातिल जिंदा है, आरोपींना फाशी द्या, योगी सरकार मुरदाबाद’ अशा घोषणा देण्यात आल्या. घटनेतील आरोपींना तत्काळ फाशी देण्यात यावी आणि पीडित मुलीला न्याय मिळण्याची मागणी निवेदनात करण्यात आली. 

यांची होती उपस्थिती

यावेळी भीम आर्मी संघटनेचे तालुका प्रमुख जितेंद्र वानखेडे यांच्यासह भगवान सोनवणे, योगेश महाले, सचिन नेतकर, कमलेश सोनवणे, मनोहर केदार, भाऊसाहेब सोनवणे ,सचिन खेडकर, सागर यांच्यासह इतर सामाजिक संघटनेचे पदाधिकारी- विजय पाटील, संदीप पाटील, प्रताप पाटील, दिनेश पाटील,  गणेश भाऊ सपकाळे ,किशोर पाटील , सागर भाऊ भोसले, राजेंद्र चौधरी, कपिल चौधरी, गणेश पाटील, ईश्वर पाटील, तेजु नळवाले, विशाल नळवाले,  ईश्वर बाबा, राकेश करोसिया, दीपक अनुष्ठान,  विनोद अवचित, विकास अंभोरे, राजू कांबळे, शाम भाऊ वंजारी, अरविंद वंजारी, रवींद्र भोई, अनिल सोनवणे, मनोज सोनवणे, निलेश कापडणे, गौतम जावळे, जुबेर भाई, फईम खान पठाण,अबीद पठाण उपस्थित होते.

यांनी दिले निवेदन 

यावेळी भीम आर्मी संघटना, वाल्मिकी मेहतर समाज, छावा संघटना, शिव छावा संघटना, शेतकरी संघटना, बंजारा शेतकरी सेना, मुस्लिम समाज मंडळ, मराठा सेवा संघ, राष्ट्रवादी युवक काँग्रेस, वंचित आघाडी, पंचशील मित्र मंडळ, भोई समाज मंडळ, संभाजी सेना, गाडीलोहार समाज यांनी निवेदन देत सहभाग घेतला.

 

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.