खडकदेवळा येथे उद्या भव्य मोफत रोग निदान शिबीर (व्हिडीओ)

पाचोरा, नंदू शेलकर । पाचोरा शहर व परिसरात अद्यायावत सुविधांनी सुसज्ज असे विघ्नहर्ता मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलतर्फे खडकदेवळा बु” ता. पाचोरा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत १८ रोजी सकाळी ८ ते दुपारी २ वाजेपर्यंत भव्य अशा मोफत रोग निदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

या शिबिरात विघ्नहर्ता मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे संचालक डॉ. भुषण मगर, डॉ. सागर गरुड, डॉ. प्रिती मगर, डॉ. गगन साबु, डॉ. सिध्दांत घोलप, डॉ. तस्सबुन पिंजारी या डॉक्टरांची टीम तपासणी करणार आहे. शिबिरात ई. सी. जी., बी. पी., ब्लड शुगर (रक्तातील साखरेचे प्रमाण तपासणे) या तपासण्या मोफत करण्यात येणार असुन टेस्ट अॅन्जोग्राफी, २ डी इको, अॅन्जोग्राफी या सारख्या टेस्ट डाॅक्टरांच्या सल्ल्यानुसार व महात्मा ज्योतिबा फुले आरोग्य योजनेच्या नियमानुसार करण्यात येणार आहेत. तसेच एम. आर. आय., सी. टी. स्कॅन, पॅथ टेस्ट, एक्सरे, अॅन्जोग्राफी या टेस्ट २० टक्के सवलतीच्या दरात केल्या जाणार आहेत. या भव्य मोफत शिबिराचा लाभ गावातील, परिसरातील तसेच जिल्ह्यातील नागरिकांनी घ्यावा असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.

Protected Content