पिंपरखेड येथे ‘रक्तदान शिबीर’ संपन्न

shibir 1

पाचोरा प्रतिनिधी । शहरातील टायगर ग्रुपच्यावतीने प्राथमिक आरोग्य केंद्र पिंपरखेड ता. भडगाव येथे महारक्तदान शिबीराचे आयोजन ग्रुपचे अध्यक्ष अजय परदेशी आणि सहकार्यांच्या मार्गदर्शनाने नुकतेचे करण्यात आले.

याबाबत माहिती अशी की, यावेळी महारक्तदान शिबीरात ‘रक्त दया, जीवन वाचवा’ व ‘रक्तदान करा, द्या जीवनदान’ असा नारा लावण्यात आला. या संदेशानुसार या ग्रुपच्या माध्यमातून जनजागृती करत समाजातील लोकांचे आरोग्य चांगले राहावे, हाच आमचा प्रामाणिक प्रयत्न आहे. याग्रुपचे संस्थापक मा. (पै) जालिंदरभाऊ जाधव पूणे, व मा. (पै) अध्यक्ष तानाजी जाधव यांनी आपल्या विचारातून वेळोवेळी आम्हाला मार्गदर्शन करत असतात. याप्रसंगी महाशिबिरात डॉ. उज्जवला वर्मा, डॉ.स्वनिल चव्हाण व त्यांच्या सहकार्यांनी येथे येऊन रक्तदान मोहीम राबविली. या शिबिरात रक्तदान करणारे मनोज राजपत, दत्तू सोनवणे, संदिप पाटील अंजनविहीरे, नितीन पाटील अंजनविहीरे, असपाक पठान पिंपरखेड, दिलीप गायकवाड गिरड, अजय कोळी निंभोरा, राकेश पाटील गिरड, राम जाधव, राम राठोड, अजय चव्हाण, यशवंत शेंगदाणे आदी लोकांनी पिंपरखेड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात रक्तदान केले.

यांची होती उपस्थिती
त्याचबरोबर ग्रूपचे उपाध्यक्ष हर्षल वाघे, पाचोरा मार्गदर्शक अध्यक्ष मा. दिपक शिरसाठ, कुह्राड येथील टायगर ग्रुपचे अध्यक्ष मा.रामकृष्ण पाटील, सुभाष न्हावी, शाखेचे मिलींद थोरात, मनोज ह्याळींगे, विजय परदेशी, मयूर पाटील, पवन मोरे, निलेश परदेशी, डॉ. जितेंद्र पाटील, रवींद्र परदेशी, राजेंद्र कोळी, सुशीला नाईक, सीमा बोरकर, गोपाल परदेशी, सुधीर पाटील यांच्यासह मित्रपरिवार, सदस्य आणि आधी या कार्यक्रमात उपस्थितीत होते.

Protected Content