जळगावात कोरोना संशयित महिलेचा मृत्यू

जळगाव प्रतिनिधी । मेहरूणमधील कोरोना पॉझिटीव्ह रूग्णाचा नवीन अहवाल निगेटीव्ह आला असतांना जिल्हा वैद्यकीय रूग्णालयात एका कोरोना संशयित असणार्‍या महिलेचा मृत्यू झाला आहे.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मध्ये आज दि.१३ एप्रिल रोजी संध्याकाळी पावणेसात वाजता ६२ वर्षे वयाच्या एका कोव्हीड संशयित स्त्री रुग्णाचा मृत्यू झाला. या महिलेला न्यूमोनियाचा त्रास होता. सदर महिलेला दि.१०/०४/२०२० रोजी या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या रुग्णाच्या स्वबचे रिपोर्ट येणे अद्यापपर्यंत मिळालेले नसल्याची माहिती प्रशासनातर्फे देण्यात आली आहे.

जिल्ह्यातील प्रत्येक बातमी आता आपल्या स्मार्टफोनवर !

वेबसाईट : https://livetrends.news

फेसबुक पेज : https://www.facebook.com/livetrendsnews01

ट्विटर हँडल : https://twitter.com/LiveTrends_News

युट्युब चॅनल : https://bit.ly/342HcXH

इन्स्टाग्राम अकाऊंट : https://www.instagram.com/live_trends_news

व्हाटसअ‍ॅप क्रमांक : ९३७०४०३२००

Protected Content