Home आरोग्य जळगावचे निजामुद्दीन कनेक्शन ?

जळगावचे निजामुद्दीन कनेक्शन ?

0
100

जळगाव प्रतिनिधी । निजामुद्दीन येथे तबलिगी जमातीच्या झालेल्या कार्यक्रमात जिल्ह्यातील १३ जण उपस्थित राहिले होते अशी माहिती समोर आली आहे.

दिल्लीतल्या निजामुद्दीन येथे तबलिगी जमातीच्या कार्यक्रमातून कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात झाल्याचे निष्पन्न झाल्यामुळे प्रचंड खळबळ उडाली आहे. या कार्यक्रमात उपस्थित राहणार्‍यांना कोरोनाचा संसर्ग होण्याचा धोका अधिक असल्याने त्यांचा शोध घेऊन त्यांची वैद्यकीय चाचणी केली जात आहे. या अनुषंगाने जळगाव जिल्ह्यात तबलिगी जमातीच्या या कार्यक्रमात १३ जण उपस्थित होते अशी माहिती समोर आली आहे. यातील सात जण जळगावातील व दोन जण भुसावळातील असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाला मिळाली. त्यांना होम क्वॉरंटाईनची सूचना दिली जाऊ शकते.

जिल्ह्यातील प्रत्येक बातमी आता आपल्या स्मार्टफोनवर !

वेबसाईट : https://livetrends.news

फेसबुक पेज : https://www.facebook.com/livetrendsnews01

व्हाटसअ‍ॅप क्रमांक : ९३७०४०३२००


Protected Content

Play sound