फैजपूर, ता. यावल प्रतिनिधी । मधुकर सहकारी साखर कारखान्याचे भवितव्य ठरविण्यासाठी आज चेअरमन शरद महाजन यांच्या अध्यक्षतेखाली लोकप्रतिनिधींची बैठक घेण्यात आली.
आज दि २४ रोजी चेअरमन शरद महाजन यांचे अध्यक्षतेखाली कारखाना कार्यक्षेत्रातील आजी व माजी लोकप्रतिनिधी यांची संयुक्त सभा मसाकाच्या मुख्य कार्यालयात पार पडली. सभेत आपला मधुकर सहकारी साखर कारखाना हा आर्थिक अडचणीत आलेला असल्याने त्यासंबंधी चर्चा करणे तसेच मागील ऊस उत्पादकांची एफ आर पी, कामगार पगार , ऊस तोडणी व वाहतूक ठेकेदार बिले, पीएफ, ठेवी या व अशा अन्य अत्यावश्यक बाबींवर चर्चा करण्यात आली. देणी अदा करणे थकीत आहे या देणी अदा होणे तसेच कारखाना चालन करणे कठीण झालेले आहे गाळप हंगाम २०१९-२० साठी ५० ते ५५ हजार मे टन ऊस गाळपासाठी उपलब्ध आहे अशा परिस्थितीत कारखाना हंगाम घेणे अत्यंत कठीण असल्याने कारखाना भाडेतत्त्वावर/ सहयोगी तत्वावर /भागीदारी तत्त्वावर देण्यासंबंधी सभेमध्ये साधक-बाधक चर्चा झाली.
या चर्चेमध्ये एक मताने वरीलपैकी कोणत्याही प्रकारे कारखाना चालन केल्याशिवाय अत्यावश्यक देणे अदा करता येणे शक्य नाही. तसेच ऊस उत्पादक, कामगार ,ऊस तोडणी व वाहतूक ठेकेदार व इतर अनेक घटक यांचे हिताचे राहील त्यामुळे सर्व उपस्थित लोकप्रतिनिधींनी कारखाना भाडेतत्त्वावर किंवा सहयोगी तत्त्वावर देण्याची संकल्पना अशा परिस्थितीत योग्य असल्याचे नमूद केले. त्यामध्ये काही लोकप्रतिनिधींनी यापूर्वी कारखाना भाडेतत्वावर /सहयोगी तत्वावर घेतलेल्या पार्टीज व संबंधित कारखाना यांची माहिती काढावी व साखर आयुक्त ,पुणे यांचे मार्गदर्शना नुसार कायदेशीर माहिती घेऊन पुनश्च संयुक्त सभा घ्यावी असे ठरविण्यात आले. पुढील संयुक्त सभेमध्ये योग्य संभाव्य धोरणे चर्चेला घ्यावीत. त्यानंतर संयुक्त सभेमध्ये एकमताने ठरलेले धोरण मान्यतेसाठी विशेष सर्वसाधारण सभेत घ्यावे असे ठरले. तसेच ऊस लागवड वाढीच्या दृष्टीने योग्य ते धोरणे राबवावीत यावेळी बहुसंख्येने कारखाना कार्यक्षेत्रातील लोकप्रतिनिधी उपस्थित होते. व्हाईस चेअरमन भागवत पाटील यांनी उपस्थित सर्व लोकप्रतिनिधींचे उपस्थित राहिल्याबद्दल आभार व्यक्त केले.