नवी दिल्ली प्रतिनिधी । मारुती सुझुकीच्या एस-प्रेसो (S-Presso) आज लाँच होत आहेत. या नव्या कारचा लुक काही प्रमाणात एसयूव्ही सारखा आहे. एस-प्रोसो मारुती सुझुकीच्या हार्टेक्ट प्लॅटफॉर्मवर तयार करण्यात आले आहे. यामुळे ती अपडेटेड क्रॅश टेस्ट नॉर्ममध्ये नक्कीच पास होईल.
अधिक माहिती अशी की, जारात मारुती एस-प्रेसोची स्पर्धा रेनॉ क्विड या कारशी होणार आहे. या कारची सुरुवातीची किंमत असणार ४ लाख रुपयांहून कमी असणार आहे. एस-प्रेसोची कन्सेप्ट सन २०१८ च्या ऑटो एक्स्पोमध्ये मारुती फ्यूचर-ए नावाने सादर केली गेली होती. लाँचिंगपूर्वी या छोट्या कारचे बरेच तपशील समोर आले आहेत. या लुकमुळे मारुतीच्या नव्या कारना छोटी एसयूव्ही देखील म्हटले जाऊ शकते. या लुकमुळे मारुतीच्या नव्या कारना छोटी एसयूव्ही देखील म्हटले जाऊ शकते. तसेच मारुती एस-प्रेसो समोरून बोल्ड दिसते. फ्रंट आणि रियर बंपर अतिशय मजबूत आणि भव्य आहे. कारचे ग्राउंड क्लिअरन्सदेखील अधिक आहे. एस-प्रोसो मारुती सुझुकीच्या हार्टेक्ट प्लॅटफॉर्मवर तयार करण्यात आले आहे. याबरोबरच ही कार वजनाने हलकी देखील असणार आहे.