पैशांसाठी विवाहितेचा छळ; गुन्हा दाखल


जळगाव लाईव्‍ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील उस्मानिया पार्क येथील माहेर असलेल्या विवाहितेला सासरी शिरपूर धुळे येथे पैशांसाठी व वस्तूसाठी मारहाण करत छळ केल्याचा प्रकार समोर आला आहे. या संदर्भात रविवारी 22 जून रोजी सायंकाळी 5 वाजता जळगाव शहर पोलीस ठाण्यात पतीसह सासरच्या मंडळी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जळगाव शहरातील उस्मानियॉ पार्क येथील माहेर असलेल्या अनफिया खान रिजवान खान वय-२३ यांचा विवाह धुळे जिल्ह्यातील शिरपूर येथील रिजवान खान कमा खान यांच्याशी रीतीरीवाजानुसार झालेला आहे. दरम्यान लग्नात कपाट, एसी, सोफा सेट, गॅस असे काही वस्तू दिले नाही, तसेच पैसे दिले नाही. या कारणावरून शिवीगाळ करणे, मारहाण करणे तसेच शारीरिक व मानसिक छळ करण्यात आला. दरम्यान या छळाला कंटाळून विवाहित माहेरी निघून आल्या. त्यानंतर त्यांनी जळगाव शहर पोलिसात फिर्याद दिली. त्यानुसार पती रिजवान खान कमा खान, नणंद संजीदाबी आसिफ अली सय्यद तसेच जेठ आयुब खान कमाखान सर्व रा. शिरपूर जि. धुळे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल प्रमोद कंखरे करीत आहे.