जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । सुप्रिम कॉलनीतील माहेर असलेल्या विवाहितेला पाच लाखांसाठी सासरी सोलापूर जिल्ह्यातील सांगोला येथे शिवीगाळ व मारहाण करून छळ केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी सोमवारी ३० जून रोजी दुपारी ४ वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात पतीसह सासरच्या मंडळींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव शहरातील सुप्रिम कॉलनी येथील माहेर असलेल्या धनश्री भारत भुसनर वय -२४ यांचा विवाह सोलापूर जिल्ह्यातील सांगोला येथील भारत राजाराम भुसनर याच्याशी रितीरिवाजानुसार झालेला आहे. लग्नाचे सुरूवातीचे काही दिवस चांगले गेले. त्यानंतर विवाहितेला व्यवसाय करण्यासाठी माहेराहून ५ लाख रूपये आणावे अशी मागणी करण्यात आली. विवाहितेने पैसे आणले नाही म्हणून तिला शिवीगाळ व मारहाण करून छळ केला. तसेच तिचे सासरकडील मंडळींनी देखील शारिरीक व मानसिक छळ केला. हा प्रकार सहन न झाल्याने विवाहिता माहेरी निघून आल्या. त्यानंतर त्यांनी सोमवारी ३० जून रोजी दुपारी ४ वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून पती भारत राजाराम भुसनर, जेठा दत्ता राजाराम भुसनर, चुलत जेठ बाळासाहेब कृष्णा भुसनर, जेठाणी अनुसुयाबाई नामदेव भुसनर सर्व रा. सांगोला जि.सोलापूर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक हेमंत जाधव हे करीत आहे.