पैशांसाठी विवाहितेला मारहाण करत छळ


भुसावळ लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । पंचशील नगरातील माहेर असलेल्या विवाहितेला सासरी मालेगाव येथे पैशांची मागणी करत शिवीगाळ व मारहाण करून छळ केल्याचा प्रकार समोर आला आहे. प्रकरणी बुधवारी १८ जून रोजी सायंकाळी ६.३० वाजता भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात पतीसह सासरच्या मंडळींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अधिक माहिती अशी की, भुसावळ शहरातील पंचशील नगरातील माहेर असलेल्या विवाहिता हिना कौसर गुफरान शेख वय २८ यांचा विवाह मालेगाव येथील शेख गुफरान शेख अन्वर वय ३४ याच्याशी समाजाच्या रितीरिवाजानूसार झालेला आहे. लग्नाचे सुरूवातीचे काही दिवस चांगले गेले त्यानंतर विवाहितेला किरकोळ कारणावरून छळ करण्यात आला. त्यानंतर वेळोवेळी पैशांची मागणी करण्यात आली. दरम्यान मागणी पुर्ण न झाल्याने पतीकडून शिवीगाळ व मारहाण करण्यात आली. तसेच सासरच्या मंडळींनी शारिरीक व मानसिक छळ केला. या छळाला कंटाळून विवाहिता माहेरी निघून आली. त्यानंतर पोलीसात तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून पती शेख गुफरान शेख अन्वर, सासू नुरअफजा शेख अन्वर, जेठा शेख रिजवान शेख अन्वर, जेठाणी फरजानाबी शेख रिजवान, जेठ शेख इमराने शेख अन्वर आणि जेठाणी अंजूमबी इम्रान शेख, पुतण्या शेख रेहाण इम्रान शेख यांच्यासह इतरांविरोधात पेालीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ पंकज शेळके हे करीत आहे.