यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या यावल शाखेच्या वतीने पक्षाचा ५९ वा वर्धापन दिन हिंदुहृदयसम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतींना वंदन करून उत्साहात साजरा करण्यात आला. यावल शहरातील प्रमुख मार्गावर असलेल्या जे.टी. महाजन व्यापारी संकुलनातील शिवसेनेच्या संपर्क कार्यालयात हा सोहळा पार पडला.
शहरप्रमुखांनी केले बाळासाहेबांच्या कार्याचे स्मरण
यावेळी पक्षाचे प्रमुख वंदनीय हिंदुहृदयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली वाहण्यात आली. याप्रसंगी शिवसेना शहरप्रमुख जगदीश कवडीवाले यांनी बाळासाहेबांच्या स्मृतीस वंदन करत, त्यांच्या कार्याचे महत्त्व अधोरेखित केले. त्यांनी बाळासाहेबांच्या विचारांची आणि त्यांनी पक्षासाठी दिलेल्या योगदानाची आठवण करून दिली.
शिवसैनिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती
या कार्यक्रमाला शिवसेना शहर उपप्रमुख संतोष खर्चे, यावल तालुका संघटक पप्पू जोशी, योगेश चौधरी, शिवसेना आदिवासी विभागाचे तालुका प्रमुख हुसेन तडवी, राजेंद्र बारी, स्वप्नील करांडे, निलेश पारासर, विजय कुंभार, प्रवीण लोणारी, सुरेश कुंभार, विनोद कोळी, बाबूलाल पटेल यांच्यासह अनेक शिवसैनिक उपस्थित होते. या सर्व शिवसैनिकांनी बाळासाहेबांच्या कार्याला अभिवादन करत पक्षाशी एकनिष्ठ राहण्याचा निर्धार व्यक्त केला.