भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भुसावळ शहरातील इकरा मदरसाजवळील जाम मोहल्ला परिसरातील माहेर असलेल्या विवाहितेला सासरी मालेगाव येथे बेकरी टाकण्यासाठी माहेराहून ८ लाख रूपयांची मागणी करून शिवीगाळ व मारहाण करून शारिरीक व मानसिक छळ केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी रविवारी ८ मार्च रोजी साडेचार वाजता भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, भुसावळ शहरातील इकरा मदरसा येथील जाम मोहल्ला येथील माहेर असलेल्या अरबीना शेख आफताब वय २१ याचा विवाह मालेगाव येथील आफताब शेख इब्राहिम यांच्याशी रितीरिवाजानुसार झालेला आहे. दरम्यान त्यांचे पती आफताब शेख इब्राहिम याने विवाहितेला बेकरी व्यवसाय करण्यासाठी माहेराहून ८ लाख रूपये आणावे अशी मागणी केली. दरम्यान विवाहितेचे पैसे आणले नाही. या रागातून विवाहितेला शिवीगाळ व मारहाण करण्यास सुरूवात केली. तसेच सासरच्या मंडळींनी देखील पैशांसाठी शारिरीक व मानसिक छळ केला. दरम्यान या त्रासाला कंटाळून विवाहिता माहेरी निघून आल्या. त्याप्रकरणी रविवारी ८ मार्च रोजी दुपारी साडेचार वाजता पती आफताब शेख इब्राहिम, सासू गजाला शेख इब्राहिम, सासरे शेख इब्राहिम शेख इस्माईल, आजोबा इस्माईल शेख गमीर, चुलत सासरे सलीम शेख इस्माईल, चुलत सासू सना शेख इस्माईल, यास्मिनबी शेख अब्दुल, नणंद फरहिन सैय्यद आशफाक सर्व रा. मालेगाव यांच्या विरोधात भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस नाईक राजकिरण झाल्टे हे करीत आहे.