जळगाव प्रतिनिधी । तालुक्यातील असोदा येथील एका २० वर्षीय विवाहितेचा पदर ओढून विनयभंग करणाऱ्या तरूणाला तालुका पोलीसांनी अटक केली आहे. याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात तरूणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अधिक माहिती अशी की, तालुक्यातील आसोदा येथील २० वर्षीय विवाहिता आपल्या कुटुंबियांसह राहते. ३० एप्रिल रोजी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास कामानिमित्त किराणा दुकानावर आल्या होत्या. त्यावेळी संशयित आरोपी भुषण प्रभाकर निंबाळकर रा. बसस्थानक जवळ याने विवाहितेचा साडीचा पदर ओढून मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करत विनयभंग केला. याप्रकरणी विवाहितेच्या फिर्यादीवरून तालुका पोलीसात तरूणावर गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल होता पोलीस निरीक्षक रविकांत सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ संजय चौधरी यांनी संशयित आरोपी भुषण निंबाळकर याला शनिवारी रात्री अटक केली आहे. पुढील तपास पोहेकॉ संजय चौधरी करीत आहे.