जळगाव प्रतिनिधी । शहरातील कोळीपेठ येथील माहेर असलेल्या विवाहितेला प्लॉट घेण्यासाठी माहेरहून ५ लाख रूपये आणावे यासाठी शिवीगाळ व मारहाण करणाऱ्या पतीसह नऊ जणांविरोधात शनीपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत माहिती अशी की, रिजवाना सज्जाद हुसेन कुरेशी (वय-३२) रा. खडकीवाडा, कोळीपेठ, जुने जळगाव यांचा विवाह सन २००७ मध्ये सज्जाद हुसेन समशोद्दीन कुरेशी रा. नायता जि. इंदौर मध्यप्रदेश यांच्याशी रितीरीवाजानुसार झाला. लग्नाचे सुरूवातीचे काही दिवस चांगले गेल्यानंतर पती सज्जाद हुसेन कुरेशी याने विवाहितेला लहान लहान गोष्टींवर शिवगाळ करणे, टोमणे मारणे सुरू केले. त्यानंतर पती सज्जाद कुरेशी याने प्लॉट घेण्यासाठी विवाहितेला माहेरहून ५ लाख रूपये आणावे यासाठी तगादा लावला. परंतू आई-वडीलांची परिस्थीत हालाखिची असल्याने पैश्यांची पुर्तता करून शकत नव्हते. यासाठी सासू, नणंद, सासरे, जेठ, दीर यांनी देखील छळ करत जीवे ठार मारण्याची धमकी दिली. हा छळ सहन न झाल्याने विवाहिता माहेरी निघून आल्यात. याबाबत विवाहितेने शनीपेठ पोलीसात तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून शनीपेठ पोलीस ठाण्यात पती सज्जाद हुसेन समशोद्दीन कुरेशी , सासू सकीनाबी समशोद्दीन कुरेशी, जेठ एजाजुद्दीन कुरेशी, दिर शब्बीर कुरेशी, अली अहमद कुरेशी, अमीर हमजा कुरेशी, अबरार अहमद कुरेशी, नणंद हिना कौसर कुरेशी, सलमा कुरेशी सर्व रा. मुण्डता, नायता, इंदौर (मध्यप्रदेश) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक यशोदा कणसे करीत आहे.