यावल तालुक्यातील अल्पवयीन मुलीचा विनयभंग; यावल पोलीसात एकावर गुन्हा दाखल

यावल प्रतिनिधी । तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या १४ वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याची घटना उघडकीला आली आहे. याप्रकरणी एकाला यावल पोलीसांनी ताब्यात घेतले असून पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत माहिती अशी की, तालुक्यातील एका गावात १४ वर्षीय अल्पवयीन मुलगी आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. आई बाजारात भाजीपाला विक्रीचे काम करते. यासाठी अल्पवयीन मुलगीदेखील आईला भाजीपाला विक्री करण्यास मदत करते.

मंगळवारी ७ डिसेंबर रेाजी सायंकाळी ५ ते ६ वाजेच्या सुमारास आईसोबत भाजीपाला विक्री करत असतांना गावातील राहूल बाळू पवार हा मुलीसमोर येवून ‘माझा नंबर घे आणि तूझा मोबाईल नंबर दे’ असे सांगितले. त्यावर मुलीने त्याला हटकले असता संशयित आरोपी राहूल पवार याने विनयभंग केला.
मुलीने आरडाओरड केली असता परिसरातील नागरीकांनी त्याला पकडून यावल पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले. मुलीच्या फिर्यादीवरून यावल पोलीस ठाण्यात संशयित आरोपी राहूल पवार याच्याविरोधात विनयभंग केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सपोनि जितेंद्र खैरनार करीत आहे.

Protected Content