जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । घर घेण्यासाठी माहेरुन पाच लाख रुपये आणावेत यासाठी जळगावातील माहेर असलेल्या विवाहितेचा छळ करणाऱ्या पतीसह सासरच्या ५ जणांविरोधात एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, शहरातील म्हाडा कॉलनी येथील ज्योती विशाल मोरे वय ३० यांचा पालघर जिल्हृयातील आंबीस्ते बुदूक येथील विशाल आन्ना मोरे यांच्यासोबत झाला आहे. २९ सप्टेंबर २०२१ ते २३ फेब्रुवारी २०२२ या कालावधीत विवाहिता ज्योती मोरे यांनी घर बांधण्यासाठी माहेरुन पाच लाख रुपये आणावेत या कारणावरुन पतीसह सासरच्या मंडळींनी वेळावेळी तिचा शारिरीक व मानसिक छळ केला. छळाला कंटाळून ज्योती मोरे ह्या माहेरी निघून आल्यात. व छळाबाबत एमआयडीसी पोलिसात तक्रार दिली. या तक्रारीवरुन ज्योती मोरे हिचे पती विशाल मोरे, अन्ना भिवसन मोरे, कुंदा अन्ना मोरे, आश्विनी अन्ना मोरे, विशाखा महेश बागले सर्व रा. आंबीस्ते ता. वाडा जि. पालघर या पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल जितेंद्र नरसिंग राजपूत हे करीत आहेत.