भुसावळ -लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | ६ जानेवारी २०२४ रोजी येथील बियाणी मिलिटरी स्कूलमध्ये भारतीय जनता युवा मोर्चा महाराष्ट्र राज्य द्वारा पुरस्कृत नमो चषक २०२४ अंतर्गत विद्यार्थ्यांसाठी मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
या स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष मनोज बियाणी, संस्थेच्या सचिव डॉ. संगीता बियाणी, संस्थेचे कार्यकारी संचालक रोनक बियाणी, आयुशी बियाणी व प्रवीण भराडिया यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून स्पर्धेला सुरुवात करण्यात आली. याप्रसंगी भुसावळ वाहतूक नियंत्रण शाखेचे ए.एस.आय. शब्बीर तडवी, पो.का.मो.अली सैय्यद, पो.का. इस्तियाक सय्यद, महेंद्र सिंगारे इत्यादी बंदोबस्त व वाहतूक सुरक्षेसाठी उपस्थित होते.
या मॅरेथॉन स्पर्धेमध्ये इ.पहिली व दुसरी प्रथम गट, तिसरी व चौथीच्या विद्यार्थ्याचा द्वितीय गट, इ.पाचवी ते सहावी तृतीय गट, इ. सातवी व आठवी विद्यार्थ्याचा चतुर्थ गट व नववी ते बारावी विद्यार्थ्यांचा पाचवा गट असे गट तयार करण्यात आले होते.शाळेच्या एकूण ९०० विद्यार्थी व विद्यार्थिनींनी यात सहभाग घेतला.
विजयी स्पर्धक याप्रमाणे – ( लहान गट ) प्रथम गट मुली : प्रथम विभूती दीपक भालेराव, द्वितीय याशिका समाधान धनगर, तृतीय मीनल ठाकरे. प्रथम गट मुले : प्रथम भावेश हरगोडे, द्वितीय ज्ञानेश्वर गजानन चौधरी, तृतीय केतन सुनील पाटील. दुसरा गट मुली : प्रथम ज्ञानेश्वरी पाटील, द्वितीय भावना पाटील, तृतीय श्रेया पाटील. मुलांमध्ये प्रथम रितेश धनगर, द्वितीय कृष्णा सोनवणे, तृतीय सानिध्य पाटील.
तिसरा गट ( मोठा गट ) मुली : प्रथम जागृती वसतकर , द्वितीय शाश्वती खुळे, तृतीय वैष्णवी कोळी.
तिसरा गट मुले : प्रथम प्रथमेश चौधरी, द्वितीय चिंतामण हाके, तृतीय नचिकेत बोंडे
चौथा गट मुली : प्रथम गुंजन कलसेवार, द्वितीय साक्षी बराटे ,तृतीय मोना गोले. चौथा गट मुले : प्रथम क्रमांक प्रथमेश सुनील पाटील, द्वितीय वेदांत माटे, तृतीय यश धनगर.
पाचवा गट : मुली प्रथम संगीता पावरा, द्वितीय सानिया तडवी, तृतीय उज्वला बारेला. पाचवा गट मुले प्रथम प्रणव बारेला, द्वितीय अभय ताराचंद पावरा तृतीय अंकुश संतोष पाटील
सदर स्पर्धेत प्रथम,द्वितीय आणि तृतीय क्रमांक पटकवणाऱ्या धावपटुचा मान्यवरांच्या हस्ते बक्षिसे देवून गौरव करण्यात आला. स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी शाळेचे प्राचार्य डी एम पाटील तसेच शाळेचे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले व धावण्याची ही स्पर्धा यशस्वीपणे संपन्न झाली.