व्यसनमुक्त समाज घडविण्या करीता सर्वानी निश्चय करा – दिलीप भागवत

WhatsApp Image 2019 12 29 at 8.08.25 PM

भुसावळ, प्रतिनिधी | व्यसनमुक्त समाज घडविण्याकरीता सर्व समाज घटकाने पुढाकार घेवून निश्चय केल्यास व्यसन मुक्त समाज घडू शकतो. पोलिस विभाग सदैव सोबत आहे. असे आश्वासन बाजारपेठ पो. नि. दिलीप भागवत यानी व्यक्त केले.

भुसावळ पोलीस विभाग भुसावळ शहर पत्रकार संघ अश्विन सागर फौंडेशन राष्ट्रीय ओडर्सम क्रांती भुसावळ चालक मालक संघटना,मजूर व मोलकरीण संघटना
तसेच सखी श्रावणी महिला बहुद्देशीय संस्था यांच्या संयुक्त विदयमाने आर्या फौंडेशनने ३१ डिसेंबर व्यसनमुक्ती संकल्प दिवस राबविण्याचा अभिनव उपक्रम हाती घेतला आहे. जनजागृती करीता येथील रेल्वे स्टेशन परिसरात छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यां जवळ २८ रोजी सायंकाळी ६ वाजता कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी भागवत बोलत होते. व्यासपीठावर अध्यक्ष जगन सोनवणे, पो. नि. दिलीप भागवत, श्री. अय्यर, लक्ष्मण तायडे, आर्याच्या डॉ. वंदना वाघचौरे , पत्रकार उज्वला बागुल, राजश्री देशमुख, चंद्रकांत चौधरी  आदी उपस्थित होते. “३१ डिसेंबर मद्याच्या धुंदीत न घालवता आपल्या परिवरासोबत घालवा …
व “दारू नाहीं …!!  दूध प्या…”!! ! In “20-20” No “90” या अशा घोषणा देत सदरील संघटना कार्येकर्त्यानी परिसर दणाणून सोडला . याप्रसंगी कार्यक्रमाचे व पोस्टर प्रदर्शनाचे उद्घाटन स्टेशन प्रबंधक अय्यर तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष जगन सोनवणे व पो.नि. दिलीप भागवत यांनी द्वीपप्रज्वलन व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळयास माल्यार्पण करून करण्यात आले. प्रस्ताविक  आर्या फौंडेशनच्या संचालिका डॉ.वंदना वाघचौरे यांनी केले. नंतर  स्टेशन परिसरात व्यसनमुक्तीसाठी जनजागृती होणे अतिआवश्यक आहे त्यासाठी असे कार्यक्रम होणे गरजेचे आहे,असे अय्यर यांनी सांगितले. नशाबंदी मंडळ सचिव चंद्रकांत चौधरी व्यसनाधीनता ही समाजाला लागलेली कीड असून सरकारने याकडे दुर्लक्ष करू नये असे सुचवले.  पत्रकार उज्वला बागुल यांनी व्यसनामुळे अनेक कुटुंब उद्ध्वस्त झाली असून आजही बहुतांशी युवावर्ग व्यसनाच्या चक्रव्यूहात अडकत चालला आहे ही अतिशय गंभीर बाब असून याकरीता शहरातील सर्व संघटना एकत्र येऊन व्यसनमुक्ती करिता प्रयत्न करू शकतो असा आशावाद वक्त केला. तर सखी श्रावणी महिला मंडळ अध्यक्ष राजेश्री नेवे यांनी व्यसन मुक्त युवा पीढी सशक्त देश घडवू शकेल असे सांगून व्यसनापासुन दूर रहा असे आवाहन केले. अश्विन सागर फौंडेशनचे अरुण तायडे यांनी पिणाऱ्या व्यक्तीवर विदारक सत्य कथन करीत कविता सादर करून व्यसन म्हजे एक शोकांतिका आहे हे पटवून दिले. अध्यक्षीय भाषणात जगन सोनवणे यांनी आपल्या सर्वांना जर व्यसनमुक्त पीढि घडवाची असेल तर समाजाने ही व्यसनमुक्ती अभियानात सहभागी होणे गरजेचे आहे त्यांनी आपल्या सर्व रिक्षा चालक मालक संघटना व मोलकरणी व मजूर संघटना याना व्यसनमुक्त रहावे व व्यसनमुक्ती अभियान आपली सदैव मदत राहील असे आश्वसन दिले. यावेळी उपस्थित असलेल्या सर्वांना जगन सोनवणे व मान्यवरांचे हस्ते दूध वितरित करण्यात आले. याकार्यकर्माचे सूत्रसंचालन राजेश्री देशमुख व आभार शहर पत्रकार संघाच्या वतीने पत्रकार उज्वला बागुल यांनी मानले. यशस्वीतेसाठी आर्या फाऊंडेशनच्या मॅनेजमेंट टीम प्रशांत निकम, सुवर्णा इंगळे , सारिका गुरचळ, वैशाली सावळे, भुसावळ पोलिस विभाग, भुसावळ शहर पत्रकार संघ, रिक्षा चालक मालक संघ, मजूर व मोलकरणी संघटना, लक्ष्मण टेंन्ट हाउस सुनिल ठाकूर, उज्वला तायडे,राजेश देऊपूजे, मोहन वाघ, राजेश धनगर, बी. वि. नाटेकर, गजानन चंराटे, अशोक कोळी यांनी कामकाज पहिले.

Protected Content