जळगाव प्रतिनिधी । जगतिक मराठी रंगभूमी दिनानिमित्त आज शहरात विविध ठिकाणी नटरंगपूजन मोठ्या उत्साहात करण्यात आले आहे.
शहरातील छत्रपती संभाजी राजे नाट्यगृहात मराठी रंगभूमी दिनानिमित्त आयोजित अखिल भारतीय नाट्य परिषदेतर्फे आज सकाळी महानगरपालिका आयुक्त उदय टेकाळे, दीपक चांदोरकर, जिल्हा बँकेच्या अध्यक्षा रोहिणीताई खडसे-खेवलकर, माजी गटशिक्षणाधिकारी निळकंठ गायकवाड आणि रंगकर्मी शंभू पाटील या मान्यवरांच्या हस्ते नटरंगपूजन करण्यात आले.
यावेळी मु.जे. महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी ‘ईदी’ एकांकीका सादर केली. या कार्यक्रमाप्रसंगी अरविंद देशपांडे, सुभाष मराठे, पियुष रावळ, रूपाली वाघ, मंजुषा भिडे, सरिता खचणे, बळवंत गायकवाड, तुषार वाघुलदे, मोहन तायडे, भानुदास जोशी, रतन बोहरा, प्रवीण पांडे, शरद पांडे यांच्यासह आदी उपस्थितीत होते. यानिमित्ताने जळगाव शहरातील सर्व रंगकर्मी एकत्र आले होते. तसेच शहराला एक सांस्कृतिक वारसा आणि परंपरा आहे. तेच औचित्य साधून दरवर्षी रंगभूमी दिनानिमित्त जिल्ह्यात विविध कार्यक्रम घेण्यात येतात.