किल्ले भाडेतत्वावर देण्याच्या निर्णयाचा मराठा समाज मंडळातर्फे निषेध (व्हिडीओ)

bhusaval 1

भुसावळ प्रतिनिधी । शहर व तालुक्यातील मराठा समाज मंडळामार्फत आज दि. 7 सप्टेंबर रोजी महाराष्ट्र सरकारने शिवकालीन किल्ले भाडेतत्वावर देण्याच्या निर्णयाचा निषेध करण्यात येत असून शासनाने हा निर्णय परत घेण्याचे निवेदन उपविभागीय अधिकारी तथा कार्यकारी दंडाधिकारी यांना देण्यात आले आहे.

याबाबत निवेदनात म्हटले की, महाराष्ट्राची अस्मिता असलेले छत्रपती शिवाजी महाराजांचे शिवकालीन किल्ले महाराष्ट्र शासनाने भाडे तत्त्वावर देण्याचा हा कुटील डाव रचला असून या निर्णयाचा समाजातून तीव्र विरोध करण्यात येत आहे. महाराष्ट्रातील शिवकालीन किल्ले आपल्यास लाभलेले मोठे वारसा आहे. त्यांचे जतन संवर्धन व संरक्षण झाले पाहिजे. त्यातून पुढील पिढ्यांना प्रेरणा मिळावी, अशी भूमिका मराठा समाजाच्या वतीने करण्यात येत आहे. शासनाने शिवकालीन सर्प किल्ले इतिहासाचे विकृतीकरण न करता जागतिक वास्तू
रचनाकारांचे व पुरातत्व विभागाचे सहकार्य घेऊन या किल्ले मूळ स्वरूपात पुनर्निमाण करावे. तसेच हे करतांना किल्ल्यांचे पावित्र्य जपले पाहिजे. किल्ले मूळ स्वरूपात पुन्हा भरल्यास पर्यटनालाही मोठी चालना मिळेल. लोकाना इतिहास कळेल. हेरिटेज च्या नावाखाली मूळ वारसा नष्ट करून हॉटेल संस्कृती रुजविण्याचा प्रयत्न चुकीचा आहे. महाराष्ट्रातील जनता हे कदापीही सहन करणार नसल्याचे निवेदनाद्वारे शिवकालीन किल्ले भाडे तत्वावर देण्याच्या निर्णयाचा सर्व मराठा समाजातर्फे निषेध करण्यात येत आहे.

निवदेनावेळी मराठा समाज मंडळाचे अध्यक्ष किरण पाटील, नगरसेवक तुषार पाटील, कृष्णा शिंदे, संजय यादव, प्रमोद पाटील, योगेश जाधव, सचिन पाटील, रुपेश पाटील, रवींद्र ढगे, राहुल पाटील, विजय कलापुरे, ज्ञानेश्वर पाटील, पांडुरंग कंदोले आणि निखिल जावरे यांच्यासह आदी उपस्थितीत होते.

Protected Content