अनेक मोठे नेते भाजपमध्ये येण्यासाठी इच्छुक : ना. गिरीश महाजन

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | राज्यातील विविध पक्षांचे मोठे नेते भाजपमध्ये येण्यासाठी इच्छुक असल्याचा गौप्यस्फोट ग्रामविकास तथा वैद्यकीय शिक्षण आणि क्रीडा मंत्री ना. गिरीश महाजन यांनी केला आहे.

माजी खासदार तथा शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत खैरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गरज पडल्यास कॉंग्रेस फोडण्याची तयारी केली असून त्यांच्याकडे २२ आमदार तयार असल्याचा दावा केल्याने खळबळ उडाली आहे. यावरून आता विविध पक्षाच्या नेत्यांनी आरोप-प्रत्यारोप केले आहेत. शिर्डीत सुरू असलेल्या राष्ट्रवादीच्या अधिवेशनात बोलतांना जयंत पाटील यांनी लवकरच राज्यातील सरकार पडेल असा दावा केला. यानंतर शहाजी पाटील यांनी राष्ट्रवादीच फुटीच्या उंबरठ्यावर असल्याचे सांगितले.

दरम्यान, राज्याचे ग्रामविकास, वैद्यकीय शिक्षण, क्रीडा व युवक कल्याण मंत्री ना. गिरीश महाजन यांनी पत्रकारांशी बोलतांना याच संदर्भात मोठा दावा केला आहे. ते म्हणाले की, शिवसेनेत फुट पडली असून इतर पक्षांपेक्षा भाजपची स्थिती मजबूत आहेत. विविध पक्षांमधील मोठे नेते भाजपमध्ये येण्यासाठी इच्छुक असल्याचा गौप्यस्फोट त्यांनी केला आहे.

Protected Content